आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 व्या मजल्यावरुन उडी मारून म्युझिशियनची आत्महत्या, महिन्यापासून राहत होता GF बरोबर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेंगळुरूचा राहणारा 29 वर्षीय म्युझिशियन करण जोसेफने शनिवारी सकाळी मुंबईच्या वांद्रे येथील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.  रिपोर्टनुसार मित्रांबरोबर टीव्ही पाहत असताना अचानक जोसेफ उठला आणि खिडकीकडे गेला आणि त्याने थेट उडी मारली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी लगेचच पोलिसांना कळवले आणि भाभा हॉस्पिटलमध्ये अॅडमिटही केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

महिनाभरापासून गर्लफ्रेंडबरोबर राहत होता करण 
- पोलिसांच्या मते करण मुंबईत एका महिन्यापासून त्याची एक मैत्रिण रिषी शाहबरोबर राहत होता. 
- दोघांचे गर वांद्र्यातील एका इमारतीत 12 व्या मजल्यावर होते. 
- पोलिसांना अद्याप सुसाइड नोट मिळालेले नाही. 
- करण नशेमध्ये होता, असे म्हटले जात आहे. पोलिसांनी करणच्या कुटुंबीयांना घटनेबाबत माहिती दिली आहे. 
- सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 
- सिंगर आणि म्युझिक डायरेक्टर विशाल ददलानी यांनी ट्वीट करून करणच्या मृत्यूप्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. 
 
पुढील स्लाइडवर विशाल ददलानी यांनी केलेले ट्वीट..
बातम्या आणखी आहेत...