Home »News» Mysterious Character In Sushant Kritis Raabta Movie

सुशांत-कृतीच्या Raabta मधील हा अभिनेता ओळखू शकाल? पाहा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 15:12 PM IST

मुंबई - दोन ते तीन तासाच्या चित्रपटासाठी कलाकार आणि त्यांच्या टीमला किती मेहनत घेतात याची आपण कल्पनाही करु शकत नाही. सध्या बॉलिवूडमध्ये मेकअपचे एक ट्रेंड फार
प्रसिद्ध होत आहे ते आहे प्रोस्थेटीक्सचे. हा ट्रेंड नवा नाही पण सध्या बॉलिवूडमध्ये फार प्रसिद्ध होत आहे.
ही एक अशी मेकअपची टेक्निक आहे ज्यामुळे Paa चित्रपटात अमिताभ बच्चन यांना एका लहान मुलाचा लुक दिला होता तर कपूर अॅण्ड स्न्समध्येही ऋषी कपूर यांना 80 वर्षाच्या
म्हाताऱ्याचा लूक दिला होता. पण त्याअगोदरही चाची 420 मध्ये कमल हसनने याच टेक्निकचा वापर करुन महिलेचा लुक मिळविला होता हे फार कमी लोकांना माहित आहे. आता या अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता राजकुमार रावचेही नाव जोडले गेले आहे.
राजकुमार राव त्याच्या आगामी चित्रपटात म्हणजेच सुशांत-कृतीच्या राबता चित्रपटात एका लहान रोलमध्ये दिसून येणार आहे. ही भूमिका एका 324 वर्षाच्या माणसाची आहे हे विशेष. या मेकअपसाठी अऩेक तास बसून राहावे लागते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही एक टॅटूवाला टक्कल असलेला माणूस पाहिला असेल तो राजकुमार राव आहे.
राजकुमारचे म्हणणे होते की त्याने हा रोल दिनेश विजन याच्या मैत्रीसाठी केला. दिनेश वीजन आणि निर्माता होमी अदजानिया यांनी राजकुमारला फायनल करण्याअगोदर त्याचे 16
लुक टेस्ट केले. प्रोडक्शन टीम शिवाय हा रोल कोण करत आहे हे चित्रपटाच्या युनिटलाही माहिती नव्हते.
राजकुमार रावने याअगोदरही बंगाली चित्रपट 'Ami Sairabanu' मध्ये एका तृतीयपंथाची भूमिका करण्यासाठी आपला लुक बदलला होता.
पुढच्या स्लाईडवर पाहा राजकुमार रावचे अजून काही फोटोज्..

Next Article

Recommended