आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जियासह या 10 अॅक्ट्रेसेस, कुणी केली आत्महत्या, तर काहींचा मृत्यू आजही आहे रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जिया खान, दिव्या भारती आणि सिल्क स्मिता)
मुंबई - आज अभिनेत्री जिया खानला या जगाचा निरोप घेऊन दोन वर्ष उलटली आहेत. अद्याप जियाच्या मृत्यूवरुन पडदा उठू शकलेला नाही. प्रथमदर्शनी जियाने आत्महत्या केल्याचे समजते. मात्र जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिची आई राबिया खान यांनी केला आहे.
मृत्यूपूर्वी जिया डिप्रेशनमध्ये होती, असे म्हटले जाते. राबिया खान यांनी जियाच्या मृत्यूसाठी अभिनता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला जबाबदार ठरवले आहे.
जिया खानला आपल्या पहिल्याच सिनेमात अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. 2007 मध्ये 'निःशब्द' हा तिचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर 2008 मध्ये आमिर खान-असिन स्टारर 'गजनी' सिनेमात तिला महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली होती. 2010 मध्ये अक्षय कुमारच्या 'हाऊसफूल'मध्येही ती झळकली होती. आपल्या छोट्याशा करिअरमध्ये तिने अमिताभ, आमिर आणि अक्षयसारख्या दिग्गज स्टार्ससोबत काम केले होते.
जियाप्रमाणेच बी टाऊनमधील अशा काही अभिनेत्री आहेत, त्यांचा मृत्यू रहस्यमयरित्या झाला होता. जाणून घ्या अशा काही सेलिब्रिटींविषयी...