आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागार्जुनच्या मुलाचे लग्न मोडले, पाहुण्यांसाठी केलेले फ्लाइटचे आरक्षण केले रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादः दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुन यांचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीचे त्याची गर्लफ्रेंड प्रेयसी श्रिया भुपाल हिच्याशी ठरलेले लग्न मोडले आहे. एका दिमाखदार सोहळ्यामध्ये 9 डिसेंबर 2016 रोजी दोघांचाही साखरपुडा झाला होता. लग्न ठरण्याआधीच जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या या प्रेमीयुगुलांनी हैदराबाद येथील जीव्हीके हाउस येथे खासगी पद्धतीने साखरपुडा केला होता. अगदी नेमक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.

पाहुण्यांसाठी केलेले फ्लाइटचे आरक्षणही केले रद्द... 
साखपुड्यानंतर हे प्रेमीयुगुल इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार होते. या दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी जवळपास सहाशे मंडळी भारतातून इटलीला जाणार असल्याचेही म्हटले जात होते. त्यांच्यासाठी फ्लाइटसुद्धा बुक झाली होती. पण आता ही फ्लाइट कॅन्सल करण्यात आली आहे. अखिल आणि श्रिया यांच्या काही कारणावरून बिनसले आणि दोघांनीही हे नाते इथेच थांबविण्याचा निर्णय घेतला. श्रिया ही प्रसिद्ध व्यावसायिक जीव्हीके रेड्डी यांची नात असून, अभिनेता नागार्जुन आणि जीव्हीके रेड्डी यांनी या दोघांचीही समजूत काढली. पण, अखिल आणि श्रियावर त्याच्या काहीही परिणाम झाला नाही.

अखिल आणि श्रियाच्या लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे आमंत्रितांनी त्यांच्या लग्नाला जाण्यासाठीची तयारी आणि आरक्षण वगैरे करण्यास सुरुवात केली होती. पण, त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे आता अनेकांच्याच मनात विविध प्रश्नांनी घर केले आहे. लग्नासाठी तयारीला लागलेल्या आमंत्रितांना त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुढे वाचा, कुठे झाली होती अखिल आणि श्रियाची भेट आणि यासंह बरेच काही... 
बातम्या आणखी आहेत...