Home »News» Nagarjunas Annapurna Studios Caught In A Major Fire Incident

साऊथच्या अन्नपूर्णा स्टूडिओला आग, या दोन फिल्मचे सेट जळून खाक

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 11:56 AM IST

  • अन्नपूर्णा स्टुडिओला लागलेली आग
मुंबई- साऊथ इंडियन अॅक्टर (तेलुगू) नागार्जुन अक्किनेनी यांच्या हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टूडिओला सोमवारी आग लागली. या आगीत दोन तेलुगू चित्रपटांचे सेट जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीच्या दुर्घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही आगीचे कारण कळू शकलेले नाही. आगी लागल्याची माहिती मिळाल्यानंतर फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या.
नाही कळू शकले आगीचे कारण
- आगीच्या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही आगीचे कारण कळू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- अन्नपूर्णा स्टूडिओ अक्कीनेनी नागार्जुन यांच्या परिवाराच्या मालकीचा आहे. येथे फिल्मच्या शुटिंगसह टीव्ही सीरियल, रियालिटी शो यांचे शुटिंग होते.
- आग लागली तेव्हा तिथे एकही शूट सुरु नव्हते, अशी माहिती आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आगीचे फोटो आणि अखिल अक्किनेनीचे ट्विट...

Next Article

Recommended