आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nana Patekar Raging On The Media To Highlight Pratyusha Banerjee Death Case

प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणी मीडियावर भडकले नाना, जाणून घ्या काय म्हणाले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाना पाटेकर आणि प्रत्युषा बॅनर्जी - Divya Marathi
नाना पाटेकर आणि प्रत्युषा बॅनर्जी
मुंबई: अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणावर राग व्यक्त केला. नाना म्हणाले, प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणावर जास्तच लक्ष दिले जात आहे. अलीकडेच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते या प्रकरणावर भडकलेले दिसले. नाना म्हणाले, 'त्या मुलीचा मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. परंतु माध्यमे याला दररोज हायलाईट करत आहे. त्या शेतक-यांचे काय, ज्यांनी आत्महत्या केल्या. त्यांचे आयुष्याचे काहीच महत्व नाही का.'
नॅशनल इश्यूवर भावूक होतात नाना...
- जेव्हा नाना प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणावर भडकले होते, तेव्हा त्यांच्यासोबत काम करत असलेला एक निर्माता म्हणाला, 'नाना नॅशनल इश्यूवर भावूक होतात. त्यांनी सावधान राहायला हवे. त्यांचा आवाज खूप दूरपर्यंत जाईल.'
- 1 एप्रिलला प्रत्युषाचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूला दोन आठवडे उलटून गेले आणि माध्यमे याला सतत अपडेट करतेय. नाना पाटेकर यांना वाटते, की प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणामुळे शेतक-यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- नाना शेतक-यांसाठी 'नाम फाऊंडेशन' चालवत आहेत. ते शेतक-यांना सांगताय, की दु:खी होऊन आत्महत्या करू नका, ते त्यांची मदत करतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतक-यांना मदत करणा-या नानांचे फोटो...