आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे नसीरुद्दीन शाह यांचे घर, वयाने 15 वर्षे मोठ्या पाकिस्‍तानी तरुणीसोबत केले होते पहिले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये येथे नसीर यांचे वडिलोपार्जित घर आहे. - Divya Marathi
उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये येथे नसीर यांचे वडिलोपार्जित घर आहे.
बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे नाव येताच एक साध्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा चेहरा जरी साधारण असला तरी प्रतिमा मात्र अतुलनीय आहे. हिंदी सिनेमांमध्ये त्यांचे योगदान वाखण्याजोगे आहे. 67 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये 20 जुलै 1949 रोजी झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नसीर यांनी अलीगढ विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचे धडे घेतल्यानंतर नसीर यांनी हिंदी सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला.

अलीगडमध्ये झाली होती पहिल्या पत्नीसोबत भेट...
- नसीर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मनारा सिकरी होते. त्यांना परवीन मुराद या नावाने ओळखले जात होते. त्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या बहीण होत्या.
- नसीर आणि मनारा उर्फ परवीन यांच्या वयात 14 वर्षांचे अंतर होते. मनारा या नसीर यांच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठ्या होत्या. लग्नाच्या वेळी नसीर 20 तर मनारा सिकरी 34 वर्षांच्या होत्या. 
- अलीगड युनिव्हर्सिटीत शिकत असताना नसीर आणि मनारा यांची भेट झाली होती. जेव्हा नसीर यांनी मनारा यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. 
- मनारा मुळच्या पाकिस्तानच्या आणि घटस्फोटित होत्या. शिवाय पहिल्या लग्नापासून त्यांना एका मुलगा होता. पण घरच्यांचा विरोध झुगारुन त्यांनी 1969 साली मनारा यांच्यासोबत लग्न केले होते. 
- पहिल्या लग्नापासून नसीर यांना एक मुलगी असून तिचे नाव हिबा आहे.

स्वतःपेक्षा वयाने 14 वर्षांनी लहान तरुणीशी केले नसीर यांनी दुसरे लग्न...
- लग्नाच्या काही वर्षांनी नसीर आणि मनारा यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. मनारा मुलगी हिबाला घेऊन परदेशी निघून गेल्या होत्या. 
- 12 वर्षे नसीर मुलगी हिबापासून दूर राहिले. 80च्या दशकात रत्ना पाठक नसीर यांच्या आयुष्यात आल्या. 
- रत्ना गुजरातच्या प्रसिध्द अभिनेत्री दीना पाठक यांच्या कन्या आहेत. गुजरातचे जावई बनलेले नसीर दुस-या लग्नाच्या वेळी 12 वर्षांच्या मुलीचे वडील होते.
- रत्ना नसीर यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहेत. 1 एप्रिल 1982 रोजी नसीर आणि रत्ना विवाहबद्ध झाले. त्यांनी रजिस्टर्ड लग्न केले होते. यांच्या लग्नाला आता 34 वर्षे झाली आहेत. 
- मनारा यांच्या निधनानंतर हिबा नसीरुद्दीन शाह यांच्याकडे आली.

कसे पडले रत्ना यांच्या एकमेकांच्या प्रेमात?
- नसीरुद्दीन यांच्यासोबतच्या नात्याविषयी रत्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, 'आमची पहिली भेट नाट्यकार सत्यदेव दुबे नावाच्या 'संभोग से संन्यास तक'च्या सरावादरम्यान झाली होती. पहिल्या भेटीत आम्हाला एकमेकांप्रती कोणतेही आकर्षण नव्हते. परंतु काही महिने एकत्र काम केल्याने आम्ही जवळ आलो.'

नसीरुद्दीन यांच्या लेकीने केला रत्नाचा आई म्हणून स्वीकार...
- नसीरुद्दीन शाह आणि रत्ना यांनी लग्न केले तेव्हा नसीरुद्दीन यांना 12 वर्षांची मुलगी होती.
- रत्ना यांनी एकदा सांगितले होते, की लग्न करून घरी गेल्यानंतर हिबा माझा स्वीकार करेल की नाही यांची थोडी चिंता वाटली. पण रत्ना आणि हिबा यांच्यात आई आणि मुलीचे नाते निर्माण झाले. 
- रत्ना यांना ईमाद आणि वीवान ही दोन मुले आहेत. ईमाद 'यू होता तो क्या होता' आणि वीवान दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या 'सात खून माफ' आणि फराह खानच्या 'हॅपी न्यू इयर'मध्ये झळकला आहे.

नसीरुद्दीन यांनी तीन राष्ट्रीय पुरस्कारांवर उमटवली मोहोर...
- नसीरुद्दीन शाह यांना आतापर्यंत तीन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण या सर्वश्रेष्ठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 
- सुरुवातीला 'निशांत', 'मंथन' आणि 'भूमिका' या सिनेमांमध्ये काम करून त्यांनी समांतर सिनेमांमध्ये जम बसवला. त्यानंतर ते एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले. या सिनेमानंतर त्यांनी 'भवनी भवाई', 'मासूम', ‘अर्धसत्य’, ‘मंडी’सारख्या सिनेमांमध्ये असा अभिनय केला ज्याची कुणीच कल्पनासुध्दा करू शकत नव्हते. 
- ‘हम पांच’नंतर त्यांनी ‘कर्मा’मधून मुख्य भूमिकांच्या सिनेमांकडे पाऊल उचलले. त्यानंतर नसिरुद्दीन शाह यांनी त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘गुलामी’ आणि ‘मोहरा’ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. 
- हिंदी सिनेमांसह त्यांनी 'भारत एक खोज' आणि 'मिर्जा गालिब' या मालिकांमध्ये दमदार भूमिका वठवल्या. 
- तीन-तीन नॅशनल अवॉर्ड नावी केलेल्या नसीरुद्दीन शाह यांनी नेहमीच आपल्या विविध अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

 आता खंडर झाला आहे नसीर यांचे एकेकाळचे आलिशान घर...
- उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये येथे नसीर यांचे वडिलोपार्जित घर आहे.
- एकेकाळची आलीशान कोठी असलेले नसीरुद्दीन शाह यांचे घर आता खंडर बनले आहे.
- आता या इमारतीत स्थानिक मेडिकल स्टोअर चालवणारे मोहम्मद यूनुस वास्तव्याला आहेत. 
- नसीरुद्दीन शाह यांचे घर राजा जहांगीराबादची कोठी या नावाने प्रसिद्ध होते.
- नसीर  यांचे वडील जहांगीराबादच्या सेनेत अधिकारी होते. ते आपल्या कुटुंबासमवेत या आलिशान कोठीत वास्तव्याला होते.
- नसीर यांचा जन्म याच कोठीत झाला होता.
- 2010 साली नसीर पत्नी रत्नासोबत या ठिकाणी गेले होते. तेव्हा त्यांनी याचा उल्लेख केला होता.  

पुढील स्लाईड्सवर बघा, नसीरुद्दीन शाह यांच्या वडिलोपार्जित घरासोबतच कुटुंबीयांचे खास फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...