राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना कंगना राणावत
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात अभिनेत्री कंगना राणावतला क्वीन चित्रपटासाठी उत्कृ़ष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण शशी कपूर प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रपतींनी भाषणात शशी कपूर यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाचा विशेष उल्लेख केला.
> सर्वोत्कृष्ट चित्रपट - कोर्ट
> सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – क्वीन
> सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – किल्ला
> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत(क्वीन)
> सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुरजित मुखर्जी (चतुष्कोन बंगाली चित्रपट)
> सर्वोत्कृष्ट अभिनेता – विजय(नंदू अवनल्ला अवलू कन्नड चित्रपट)
> लोकप्रिय चित्रपट – मेरी कोम
> विशेष उल्लेखनीय चित्रपट – किल्ला(मराठी)
> सर्वोत्कृष्ट संगीतकार – विशाल भारद्वाज(हैदर)
> सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – एलिझाबेथ एकादशी
> सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म - मित्रा(रवी जाधव)
> सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – बलजिंदर कौर(पगडी हरयाणवी)
>सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – सुखविंदर सिंग(हैदर)
> सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन –
विशाल भारद्वारज. हैदर
पार्श्वगायन – नाईंटीन एटी थ्री(मल्याळम)
> सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - सुदेश बिसमिल(हैदर)
> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सैवम(तामिळ) आणि उत्तरा उन्निकृष्णन
> सर्वोत्कृष्ट वेशभूषा – डॉली आहलुवालिया(हैदर)