आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींची कबुली - \'पिंक\'साठी लिहिले होते पत्र, नात म्हणाली, आजोबांनी जे म्हटले तेच करेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात नव्या नवेली आणि आराध्यासाठी एक पत्र लिहिले होते. आता नव्याने आपल्या आजोबांच्या पत्राला उत्तर दिले आहे. नव्याने लिहिले, "नानू मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागेन."
अमिताभ यांनी त्यांच्या नात आराध्या (४ वर्षे) आणि नव्या (१८ वर्षे) या दोघींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, "तुम्ही दोघी नंदा वा बच्चन असाल, पण तुम्ही आहात मुली महिलाही... तुम्ही महिला असल्याने लोक तुमच्यावर त्यांचे विचार लादतील. ते सांगतील... असे कपडे घाला, असे वागा, कुणाला भेटायला जा, कुठे जाऊ शकता. पण तुम्ही लोकांच्या निर्णयांच्या छायेत जगू नका. स्वत:च्या बुद्धीने निर्णय घ्या. तुमच्या स्कर्टच्या लांबीवरून तुमच्या चारित्र्याचे मोजमाप करता येईल, असे कुणालाही वाटू देऊ नका." अमिताभ यांनी मानले, की त्यांनी हे पत्र त्यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पिंक या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने लिहिले होते.

काय म्हणाले अमिताभ...
- अमिताभ यांनी कबुले केले, "असे लेटर पिंकच्या प्रमोशनसाठी चांगले ठरेल, असे आम्हाला वाटले होते." - ही कल्पना सुजित सरकार (पिंक या सिनेमाचे सहनिर्माते) यांची होती. त्यांनी मला म्हटले, की सिनेमाच्या विषयाला पत्राच्या स्वरुपात मांडायला हवे. त्यांनीच मला माझ्या नातींना पत्र लिहिण्याची कल्पना दिली. या पत्राच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना सिनेमाची कथा चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकलो.

नव्या आणि श्वेता नंदा यांनी काय म्हटले...
- अमिताभ यांनी सांगितल्याप्रमाणे, नव्या त्यांना म्हणाली, की नानू तुम्ही जे सांगितले, तसेच मी करेल.
- अमिताभ यांनी सांगितले, की त्यांची मुलगी श्वेता अनेक वर्षांपासून नव्याला या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र एका पत्राने नव्या ती शिकली, जे श्वेता गेल्या अनेक वर्षांपासून तिला शिकवण्याच प्रयत्न करत होती.

अमिताभ यांनी काय लिहिले होते पत्रात...
अमिताभ यांनी फेसबुकवर पत्र आणि त्याचा व्हिडिओ जारी केला होता. त्यात ते म्हणतात, हे पत्र यासाठी लिहितोय की ते फक्त तुमच्यासाठी नव्हे तर सर्व नातींसाठी आहे. त्यांचे पत्र त्यांच्याच शब्दांत...
नमस्ते आराध्या, मला माहीत नाही तू हे कधी वाचशील, मात्र हे माझे २०१६ मधील विचार आहेत.
नव्या नवेली, हॅलो, नमस्ते. मी तुम्हा दोघींना एक पत्र लिहिलंय. तेच वाचून दाखवतोय. ते इंटरनेटवरही टाकेन. कारण मला नाही वाटत की हे पत्र फक्त तुम्हा दोघींसाठी आहे, ते तर प्रत्येक नातीसाठी आहे. ठीक आहे...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, बिग बींनी लिहिले पत्र त्यांच्याच शब्दांत..
बातम्या आणखी आहेत...