आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे नवाब फॅमिली, वडील होते क्रिकेटर, तर मुलांपासून सूनेपर्यंत सर्वच आहेत फिल्म स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मन्सूर अली खान पतौडी यांचे कुटुंबीय - Divya Marathi
मन्सूर अली खान पतौडी यांचे कुटुंबीय

भोपाळः टायगर पतौडी अर्थातच भोपाळचे नवाब आणि सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांचे आजच्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर रोजी निधन झाले होते. divyamarathi.com तुम्हाला त्यांच्या कुटुबींयांविषयी सांगत आहे...
पतौडी कुटुंब
मन्सूर अली खान पतौडी यांनी अलीगढ येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ते डेहरादून येथील वेलहम बॉइज स्कूलमध्ये गेले. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी ब्रिटेनची निवड केली. ते इफ्तिखार अली खान पतौडी यांचे पुत्र होते. इफ्तिखार अली खान पतौडी यांना सीनिअर पतौडी म्हणून ओळखले जाते. ते भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार होते. मन्सूर अली खान पतौडी यांचे लग्न 27 डिसेंबर 1969 रोजी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबत झाले होते. त्यांना एकुण तीन मुले. सैफ अली खान हे त्यांच्या मुलाचे तर सबा आणि सोहा ही मुलींची नावे आहेत. सैफ आणि सोहा बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. तर सबा ज्वेलरी डिझायनर आहे. सैफचे लग्न बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरसोबत झाले आहे, तर सोहाचे लग्न बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूसोबत झाले आहे.
कधी झाले निधन
मन्सूर अली खान पतौडी यांचे 22 सप्टेंबर 2011 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले होते. 23 सप्टेंबर रोजी मन्सूर अली यांना गुडगाव जिल्ह्यातील पतौडी महलातील कब्रस्थानात दफन करण्यात आले. त्यांच्या शेजारीच त्यांच्या आजी-आजोबा आणि वडिलांची कब्र आहे.
पुढे पाहा, पतौडी कुटुंबाची छायाचित्रे...