आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नवाजुद्दीनने स्वतःला सांगितले 16.66% हिंदू, अजून केले काही खुलासे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकताच एक व्हिडिओ वायरल केला आहे. त्यात त्याने धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला आहे. 42 वर्षीय नवाजुद्दीनने व्हिडिओमध्ये प्लेकार्डच्या मदतीने स्वत:चा परिचय दिला आहे. याद्वारे नवाजुद्दीनने सांगितले की, त्याने स्वत:ची डीएनए टेस्ट केली तेव्हा त्याला असले कळाले की तो,16.66% हिंदू, 16.66% मुस्लिम, 16.66% सिख, 16.66% ईसाई, 16.66% बौद्ध आणि बाकी 16.66% जगातल्या सर्वच धर्माचा आहे. पण  या सर्व धर्मानंतर जेव्हा त्याने त्याच्या आत्म्याला विचारले तेव्हा त्याला असे कळाले की तो 100 % एक कलाकार आहे. 
 
या व्हिडिओला नुकताच झालेल्या सोनू निगमच्या अजान विवादाशी जोडले जात आहे. या व्हिडिओद्वारे नवाजुद्दीनने एका कलाकाराने नेहमीच धार्मिक सहिष्णुता जपली पाहिजे असा संदेश दिला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...