आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमीनिमित्त कृष्ण बनला नवाजुद्दीनचा लहानगा, ट्विटरवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीनने  मुलगा यानी सिद्दीकीच्या जन्माष्टमीनिमित्त केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर यामुळे नवाजुद्दीनवर अनेकांनी निशाना साधला आहे. तर काही लोक नवाजुद्दीनचे कौतुकही करत आहेत. 
 
43 वर्षीय अभिनेता नवाजुद्दीनने ट्वीटरवर त्याच्या मुलाचा फोटो शेअर केला. ज्यात त्याने जन्माष्टीनिमित्त कृष्णाचा पेहराव केलेला आहे. हा फोटो शेअर करताना नवाजुद्दीनने लिहीले की, "माझ्या मुलाला 'नटखट नंदलाला' बनण्याची संधी दिल्याबद्दल मी शाळेचा आभारी आहे."  
नवाजुद्दीनच्या या ट्वीटला 20 हजार लाईक्स आणि साडे पाच हजार वेळेस रिट्वीट करण्यात आले आहे. काही यूजर्सनी यानंतर लवकरच फतव्याचा सामना करण्यासाठी तयार राहा असा धमकीवजा संदेशही दिला आहे. 
 
'मुन्ना मायकल' चित्रपटातील अभिनेता नवाजला मागील वर्षी शिवसेनेच्या रोषाला बळी पडावे लागले होते. नवाजला एका रामलीला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले होते. शिवसेनेने नवाजचा विरोध दर्शवत सांगितले होते की गेल्या 50 वर्षापासून कोणताच मुस्लिम या कार्यक्रमाचा हिस्सा नसतो. 
बातम्या आणखी आहेत...