आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निहारिकाच नाही, नवाजुद्दीनच्या पुस्तकात होता या 11 महिलांचा उल्लेख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निहारिका सिंह सोबत नवाजुद्दीन सिद्दीकी. - Divya Marathi
निहारिका सिंह सोबत नवाजुद्दीन सिद्दीकी.
मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकीची अप्रकाशित बायोग्राफी 'अॅन ऑर्डिनरी लाइफ' वादग्रस्त ठरली आहे. एवढीच नाही तर त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. यानंतर अखेर नवाजुद्दीनला बायोग्राफी सपशेल मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. सोशल मीडियावर माफी मागत तो म्हणाला, 'माझ्या पुस्तकाने ज्यांच्या भावना दुखावल्या आहे, मी त्या सर्वांची माफी मागतो. या पुस्तकाचा मला पश्चताप होत आहे. त्यामुळे मी हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेत आहे.' या ट्विटनंतर अवघ्या 24 तासांत ऑनलाइन रिटेलर अॅमेझॉननेही या पुस्तकाची विक्री बंद केली. 
 
महिलांबद्दलच्या उल्लेखाने वादग्रस्त ठरले पुस्तक 
- अशी माहिती आहे, की नवाजुद्दीनने या पुस्तकात त्या सर्व महिलांचा उल्लेख केला, ज्या त्याच्या आयुष्यात आल्या होत्या. त्यांच्यासोबतच्या सोबतीची रसभरीत वर्णने या पुस्तकात होती. यातील काही अॅक्ट्रेस देखील होत्या. त्यापैकी एक अॅक्ट्रेस निहारिका सिंहने, पुस्तकाची विक्री होण्यासाठी नवाज सर्रास खोटे बोलत असल्याचे म्हटले होते. त्याने पुस्तकात काहीही लिहिले असून वास्तवाशी त्याचा काडीमात्र संबंध नाही. येथूनच या पुस्तकाच्या वादाला सुरुवात झाली होती. हे झाली पुस्तकात उल्लेख झालेल्या एका अॅक्ट्रेसबद्दल, मात्र पुस्तकात या एकीबद्दलच लिहिले नव्हते तर तब्बल 11 महिलांचा उल्लेख नवाजने केला होता.
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आयुष्याच्या कोण-कोणत्या टप्प्यावर नवाजुद्दीच्या आयुष्यात आल्या 11 महिला... 
बातम्या आणखी आहेत...