आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाबूमोशाय बंदूकबाज'चा Teaser रिलीज, कॉन्ट्रॅक किलरच्या भूमिकेत नवाजुद्दीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाजुद्दीन सिद्दिकीच्या 'बाबूमोशाय बंदूकबाज या आगामी चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. नवाजुद्दीननेही आपल्या फेसबुक अकाउंटवर हे टिजर अधिकारिकरीत्या प्रदर्शित केले. या चित्रपटात नवाज एक दारुडा, वेश्याबाजी करणारा वाईट माणूस दाखवला आहे. कुशल नंदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. चित्रपटात ताहिर भसीन हा सुद्धा नवाजबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  

पोस्टरमध्ये पाठमोरा दिसला होता नवाजुद्दीन... 
'बाबुमोशाय बंदुकबाज' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये नवाजचा चेहरा दिसत नाही. पण यात तो एका गरीब वर्गातला दाखवलाय, हे लक्षात येतं. हातात डबा घेऊन तो टॉयलेटला जातोय, असा फोटो आहे. प्रेक्षकांना नवाजच्या भूमिकेबद्दल बरीच उत्सुकता आहे. सिनेमात रोमान्स आणि कॉमेडी आहे.
 
पुढील स्लाईडवर बघा, 'बाबुमोशाय बंदुकबाज' या चित्रपटाचा टीजर आणि तिस-या स्लाईडवर चित्रपटाचे पोस्टर