मुंबई - बॉलिवूडमधील सर्वात टॅलेंटेड अॅक्टर्समध्ये समावेश असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यात त्याने जाहीर केले की, त्यालाही बॉलिवूडमध्ये रंगभेदाचा सामना करावा लागला आहे. नवाजने पोस्टमध्ये लिहिले, मला गोऱ्या आणि हँडसम लोकांबरोबर चित्रपटात घेणे शक्य नाही, याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद, कारण मी सावळा आहे आणि सुंदरही नाही. पण मी कधीही याचा विचार केलेला नाही.
असे आहे प्रकरण..
- नवाजुद्दीनने हे ट्विट 'बाबूमोशाय बंदूकबाज'चा कास्टिंग डायरेक्टर संजय चौहानच्या वक्तव्यानंतर केले आहे. चौहान म्हणाले होते की, गोऱ्या आणि सुंदर हिरोईन्सच्या अपोझिट नवाजुद्दीनला कास्ट करू शकत नव्हतो. तसे केले असते तर ते फार विचित्र वाटले असते.
- संजयने म्हटले होते की, नवाजुद्दीन यांच्या अपोझिट चित्रपटात आधी चित्रांगदा होती. पण ती गेल्यानंतर नवाजुद्दीनला डोळ्यासमोर ठेवूनच इतर हिरोईन्स घेतल्या. कारण नवाजच्या अपोझिट गोऱ्या हिरोईन्स कास्ट करता येणे शक्य नव्हते.
- नवाज नुकताच श्रीदेवीच्या 'मॉम' चित्रपटातही झळकला आहे, तसाच तो लवकरच टायगर श्रॉफच्या 'मुन्ना मायकल' मध्येही दिसेल.
पुढील स्लाइड्सवर, नवाजने म्हटले होते.. बॉलिवूडमध्ये ब्युटीपेक्षा टॅलेंटला अधिक महत्त्व..