आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयकुमारसह सायनावर नक्षल्यांची पत्रकातून टीका, सुकमा शहिदांच्या कुटुंबीयांना मदत केल्याचा राग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- अभिनेता अक्षयकुुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी अलीकडे सुकमा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलेल्या मदतीबाबत नक्षलवाद्यांनी पत्रकात टीका केली आहे. असे असले तरी पोलिसांनी पत्रकाच्या विश्वासार्हतेचा तपास केला जात असल्याचे सांगितले.
 
पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या हल्ल्यात शहिदांच्या वारसांना अक्षयकुमार व सायना नेहवाल यांनी अर्थसाहाय्य केल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे पत्रकात म्हटले आहे. पीआयजीए माओवादी कम्युनिस्ट पार्टीची सशस्त्र शाखा आहे. प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींनी गरीब नागरिक व क्रांतिकारी चळवळीच्या बाजूने उभे राहावे व सरकारकडून होणाऱ्या मानवी हक्काच्या गळचेपीचा निषेध करावा, असे पत्रकात म्हटले आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा, नक्षल्यांनी अक्षयच्या विरोधात काढलेले पत्रक..
बातम्या आणखी आहेत...