आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबराम-नीता अंबानीबरोबर पत्नी गौरीच्या डिझायनर स्टोरमध्ये पोहोचला शाहरुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीता अंबानी अबराम, शाहरुख खान आणि गौरी खान. - Divya Marathi
नीता अंबानी अबराम, शाहरुख खान आणि गौरी खान.
सोमवारी सायंकाळी शाहरुख गौरीच्या डिझायनर स्टोरमध्ये पोहोचला. यावेळी त्याच्याबरोबर नीता अंबानी आणि मुलगा अबरामही होता. नीता पहिल्यांदाच गौरीच्या स्टोरमध्ये आल्या होत्या. यावेळी शाहरुख ब्लॅक कार्गो पँट आणि टीशर्टमध्ये होता. तर गौरी व्हाइट आउटफिटमध्ये आणि नीता यांनी जीन्स आणि लाइट पिंक कलरचा टॉप परिधान केलेला होता. काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि नीता अंबानी एका फॅशन मॅगझिनच्या कव्हरवरही एकत्र झळकले होते. गौरीने तिच्या स्टोरचे फोटो इन्स्टाग्रामवरही शेयर केले आहेत.
 
गौरीने नीताबरोबरचा एक फोटो शेयर करत लिहिले, 'Thank you for spending the evening at #gaurikhandesigns . Was a pleasure having u over at the store'. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरही गौरीच्या डिझायनर स्टोरवर पोहोचला होता. रणबीर म्हणाला होता की, गौरीने त्याचे घरही डिझाइन केले आहे. त्यामुळे त्याला तिचे टॅलेंट माहिती आहे. तिची स्टाइल आणि विचार करण्याची पद्धत खास आहे. ती हेही म्हणाली की, तो पहिल्यांदाच गौरीच्या स्टोरवर आला आहे. रणबीरच्या आधी काजोल, राणी मुखर्जी, श्रीदेवी, मलायका अरोरा, करण जोहर, सुझैन खानही गौरीच्या स्टोरवर येऊन गेले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, गौरीच्या स्टोरचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...