आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी रणदीप हुड्डाची GF होती 'गरम मसाला'ची ही अॅक्ट्रेस, होळीसाठी केले खास फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'गरम मसाला' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अॅक्ट्रेस नीतू चंद्राने अलीकडेच होळीच्या निमित्ताने एक खास फोटोशूट केले आहे. यामध्ये नीतू रंगात न्हाऊन पोझ देताना दिसतेय. नीतूने हे फोटोशूट 8 मार्च रोजी मुंबईत स्पेशल होळीसाठी केले आहे. या फोटोशूटचे काही फोटोज नीतूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये ती गॉर्जिअस लूकमध्ये दिसतेय. 

रणदीपसोबतच्या अफेअरमुळे लाइमलाइटमध्ये होती नीतू... 
एकेकाळी नीतू चंद्रा आणि रणदीप हुड्डा यांच्या अफेअरच्या ब-याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र 2012 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. लग्नासाठी दोघांच्या कुटुंबीयांनी एकमेकांची भेटसुद्धा घेतली होती. पण नेमक्या कोणत्या कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण नीतू रणदीपच्या स्मोकिंगच्या सवयीला कंटाळली होती, अशी दबक्या आवाजात चर्चा होती.  

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, नीतूशी निगडीत खास गोष्टी आणि बघा फोटोशूटची खास झलक...  
 
बातम्या आणखी आहेत...