Home | News | Neha Agrawal Leading Actor Of Shaadi Mein Zaroor Aana

ही आहे राजकुमार रावची ऑनस्क्रिन बहिण, पहिली कमाई होती 700 रुपये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 25, 2017, 10:30 AM IST

टीव्ही सीरियल्स ते चित्रपटांपर्यंतच्या प्रवासाविषयी तिने DivyaMarathi.Com सोबत दिलखुलास बातचीत केली आहे.

 • Neha Agrawal Leading Actor Of Shaadi Mein Zaroor Aana

  मुंबई/जमशेदपूर - बॉलिवूड अॅक्टर राजकुमार राव याला 'न्यूटन' चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी 2017 चा मिस्टर आशिया पॅसिफिक स्क्रिन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्याचा 'मेरी शादी में जरुर आना' हा सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये त्याच्या ऑनस्क्रिन बहिणीची भूमिका झारखंडमधील जमेशदपूरची रहिवासी नेहा अग्रवालने साकारली होती. नेहाने सांगितले की तिला तिच्या पहिल्या शूटसाठी 700 रुपये मानधन मिळाले होते. नेहाचा जमेशदपूर ते मुंबईचा प्रवास फार खडतर राहिला आहे. टीव्ही सीरियल्स ते चित्रपटांपर्यंतच्या प्रवासाविषयी तिने DivyaMarathi.Com सोबत दिलखुलास बातचीत केली आहे.

  असा होता मुंबईचा प्रवास...

  तिसरीत असताना सुरु केली अॅक्टिंग
  - नेहा अग्रवाल 2014 मध्ये अॅक्टिंगसाठी मुंबईत दाखल झाली होती. तेव्हापासून ती आता मुंबईत राहाते. नेहाचे शालेय शिक्षण तिच्या होमटाऊनमध्ये झाले. येथील केरला पब्लिक स्कूलमध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून तिने ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. नेहाचे वडील श्याम सुंदर अग्रवाल बिझनेसमन आहेत तर आई ममता अग्रवाल हाऊसवाइफ आहे. नेहाला एक बहिण आणि एक छोटा भाऊ आहे.
  - नेहाने सांगितले की अॅक्टिंगबद्दल ती सुरुवातीपासून सीरियस राहिली आहे. ती जेव्हा शाळेत तिसऱ्या वर्गात होती, तेव्हापासून तिने अॅक्टिंग सुरु केली आहे. शाळेत तिने एका ड्रामामध्ये काम केले होते. नेहा सांगते की तेव्हा या ड्रामामध्ये काम करण्यासाठी मीच योग्य आहे, असा तिच्या टिचरला ठाम विश्वास होता.

  असा होता जमशेदपूर ते मुंबई प्रवास
  नेहा म्हणाली, की मुंबईला जाणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. आमच्या शाळेत लोकल चॅनलचे काही लोक ऑडिशनसाठी आले होते. त्यांना एका सामाजिक विषयावर फिल्म तयार करायची होती. त्यासाठी हे ऑडिशन होते. या फिल्मसाठी माझे सिलेक्शन झाले. हा आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर मी काही शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. जेव्हा मुंबईला जाण्याचा विचार केला आणि त्याबद्दल घरच्यांना सांगितले, तेव्हा आई-वडील तर तयार झाले. मात्र जेव्हा शेजारी, नातेवाईक यांच्यासोबत चर्चा झाली त्यानंतर ते मुलीला मुंबईला पाठवायचे की नाही, याचा विचार करु लागले. मुलगी एकटी मुंबईत कशी राहिल याची चिंता त्यांना सतावत होती, अखेर नेहाच्या एका मित्राने तिच्या कुटुंबियांना राजी केले आणि नेहा मुंबईला आली.

  मुंबईला आल्यानंतर 9 महिन्यांनी मिळाले पहिले काम
  मुंबईला आल्यानंतर नेहा अंधेरीला पीजी म्हणून राहायला लागली होती. हळुहळु तिला इंडस्ट्रीबद्दल माहिती होऊ लागली. ऑडिशनसाठी तासन् तास ती रांगेत बसलेली राहायची. अखेर 9 महिन्यानंतर तिला पहिले काम मिळाले. एका राजस्थानी फिल्मसाठी तिने शूट केले. या कामाचे तिला 700 रुपये मिळाले होते. यानंतर नेहा टीव्ही सीरियल क्राइम पेट्रोलमध्ये काम करु लागली. येथे तिने 2 वर्षात 76 एपिसोडमध्ये लीड अक्टर आणि सपोर्टिंग अॅक्टरचे रोल केले. सावधान इंडियाच्या 18 एपिसोडमध्ये नेहा होती. डीडी नॅशनलच्या हॅपी होममध्ये लीड रोलमध्ये नेहा होती. यासोबतच बिहारचा एक शो (हमार ब्याह कब हुई) देखील नेहाने केला आहे.

  असा मिळाला 'शादी में जरुर आना'
  नेहाने सांगितले, की एक दिवस तिला फोन आला की, मॅम तुम्हाला ऑडिशनसाठी यायचे आहे. त्यानंतर नेहाने नेहमी प्रमाणे ऑडिशन दिले आणि घरी परत आली. दुसऱ्याच दिवशी कॉल आला की तुम्ही जे ऑडिशन दिले होते, त्यासाठी तुमची निवड झाली आहे. त्यानंतर नेहा लागलीच निर्मात्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि फिल्मबद्दलची सर्व माहिती घेतली. येथे आल्यानंतर तिला माहित झाले की हे ऑडिशन 'शादी में जरुर आना' या फिल्मसाठी होते. यामध्ये राजकुमार रावच्या बहिणीची भूमिका नेहाला करायची होती. फिल्ममध्ये नेहाने राजकुमारच्या लहान बहिणीची भूमिका केली आहे. तिने सांगितले की फिल्मची शुटिंग लखनऊमध्ये झाली.

  पुढील स्लाइडमध्ये पाहा, नेहाचे निवडक फोटोज...

Trending