आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: नेहा धुपियाला अपघात, मदतीऐवजी लोकांची सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यास गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री नेहा धुपिया सध्या छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. तिच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून शोच्या प्रमोशनसाठी ती चंदिगड येथे पोहोचली. प्रमोशननंतर चंदिगडहून परतत असताना नेहाच्या कारचा अपघात झाला. मुंबईला परतण्यासाठी नेहा चंदीगड विमानतळाकडे जात होती. मात्र मध्येच तिच्या कारचा अपघात झाला. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली होती. त्यामुळे एक तासाहूनही अधिक वेळ नेहाला अपघातस्थळीच अडकून राहावं लागलं होतं.

सुदैवाने कुणीही गंभीर जखमी नाही... 
या अपघातात सुदैवाने नेहाला गंभीर दुखापत झाली नाही. यावेळी नेहासोबत काही लोक कारमध्ये होते. कारमध्ये असणाऱ्यांनाही गंभीर दुखापत झाली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, नेहाच्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे.  

लोकांची सेल्फी-ऑटोग्राफ घ्यायला जमली गर्दी.. 
धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर लोकांनी तिला मदत करण्याऐवजी तिच्यासोबत सेल्फी काढायला गर्दी केली. काहींनी तर चक्क तिला ऑटोग्राफचीही मागणी केली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. अपघातानंतर तेथील लोकांचं वागणं तिच्यासाठी धक्कादायक होतं. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी, तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी लोकांनी तेथे गर्दी केली होती. हा सर्व प्रकार संतापजनक असल्याने याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत.
बातम्या आणखी आहेत...