आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश खन्नांचा \'आशीर्वाद\' बंगला होणार जमीनदोस्त, बांधणार मल्टीस्टोरी बिल्डिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा विक्री झालेला आशीर्वाद बंगला)
मुंबईः बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांचा मुंबईतील बंगला 'आशीर्वाद' मंगळूरु येथील बिझनेसमन शशी किरण शेट्टी यांनी काही महिन्यांपूर्वी खरेदी केला. आता ताजी बातमी म्हणजे, हा बंगला तोडून येथे मल्टीस्टोरी बिल्डिंग उभी करण्याची योजना आखली जात आहे. खुद्द शशी यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले, ''आम्ही या प्रॉपर्टीचे पुननिर्माण करत आहोत. काही महिन्यांपूर्वी त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.'' यासोबतच त्यांनी सांगितले, की येथे तयार होणा-या मल्टीस्टोरी बिल्डिंगला बंगल्याचेच नाव देण्यात येणार आहे. नवीन बिल्डिंग तीन किंवा चार मजली असू शकते.
शशी यांनी 95 कोटींना खरेदी केला होता बंगला
कार्टर रोडवर असलेल्या या बंगल्याला उद्योगपती आणि ऑलकार्गो लॉजेस्टीक कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी 95 कोटीला विकत घेतले आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात शशी यांनी हा बंगला खरेदी केला. बंगल्याच्या विक्रीच्या वेळी ट्विंकल, रिंकी आणि डिंपल खन्ना हजर होत्या. राजेश खन्ना यांनी 1970 मध्ये दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता. शेवटच्या श्वासापर्यंत ते याच बंगल्यात राहिले.
पुढे वाचा, राजेश खन्ना यांच्यासाठी लकी होता हा बंगला...