आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या राय बच्चन स्टारर 'जज्बा'चे NEW POSTER झाले रिलीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऐश्वर्या राय बच्चनच्या 'जज्बा' या आगामी सिनेमाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये ऐश्वर्या धावताना दिसत आहे. तसेच इरफान खान तिचा पाठलाग करताना दिसतो. पोस्टरच्या बॅकग्राऊंडमध्ये पोलिसांच्या गाड्या आणि भारतीय जवान दिसत आहेत. मोशन पोस्टरमध्ये पोलिसांचा सायरनसुध्दा ऐकायला येतो.
संजय गुप्ता दिग्दर्शित या सिनेमामध्ये ऐश्वर्या दिर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सिनेमात ऐश्वर्या, इरफानशिवाय शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, अभिमन्यू सिंह, अतुल कुलकर्णी, सिध्दार्थ कपूर आणि चंदन रॉय सान्यालसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमा यावर्षी 9 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'जज्बा'चे स्टिल पोस्टर...