आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : आता नातेवाईक होणार आहेत सलमान खान आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर, जाणून घ्या कसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला : होय हे खरे आहे... अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर आता नातेवाईक होणार आहेत. याचवर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचे हे नाते जुळणार आहे. या नवीन नात्यामुळे सलमान खान आणि गौतम गंभीर एकमेकांचे भाऊ होणार आहेत.
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता हिचे लग्न हिमाचलमधील मोठे राजकारणी घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या शर्मा कुटुंबातील आयुष शर्मासोबत झाले आहे. आयुषचा थोरला भाऊ आश्रयचे लग्न क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या चुलत बहिणीसोबत ठरले आहे. आयुष आणि आश्रयचे आजोबा सुखराम शर्मा माजी केंद्रीय मंत्री आहेत. तर आयुषचे वडील अनिल शर्मा हिमाचलच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री आहेत. गौतम गंभीरची बहीण राधिका आणि सलमानची धाकटी बहीण अर्पिता आता जावा होणार आहेत. या नात्यानुसार सलमान आणि गौतमसुद्धा एकमेकांचे भाऊ होतील.
धाकट्या भावासोबत झाले आहे सलमानची बहीण अर्पिताचे लग्न...
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचा छोटा नातू आयुषसोबत अर्पिताचे लग्न झाले आहेत. तर त्यांचा मोठा नातू आश्रयचा साखरपुडा अलीकडेच गौतम गंभीरच्या चुलत बहिणीसोबत झाला आहे. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सलमान अनुपस्थित होता. मात्र त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य अर्पिताच्या घरी झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राधिकाच्या वडिलांचा आहे कारचा बिझनेस
गौतम गंभीरचे काका आणि राधिकांच्या वडिलांचा इम्पोर्टेड कार सेलचा बिझनेस आहे. राधिका लॉ ग्रॅज्युएट असून फॅशन ब्लॉगर आणि डिझायनरच्या रुपात काम करते. आश्रय शर्मासुद्धा बिझनेसमन अशून मंडी जिल्हा काँग्रेस कमेटीचा महासचिव आहे.
सिम्बॉयसिस कॉलेजमधून राधिकाने पूर्ण केले ग्रॅज्युएशन
गौतम गंभीरची बहीण राधिकाने दिल्लीतील सिम्बॉयसिस कॉलेजमधून लॉची पदवी प्राप्त केली आहे. गंभीर कुटुंबीयांचे शर्मा कुटुंबीयांसोबत जुने संबंध आहेत. आता हे संबंध नात्यात बदलत आहेत. आश्रय शर्माने फेसबुक अकाउंटवर राधिकाचे छायाचित्रे पोस्ट करुन साखरपुड्याची माहिती दिली.
आश्रय हिमाचलमध्ये सांभाळतोय सलमानच्या एनजीओचे काम
हिमाचलमध्ये पार पडलेल्या अर्पिता आणि आयुषच्या रिसेप्शनमध्ये सलमान सहभागी झाला होता. यानिमित्ताने तो हिमाचलमधील मंडी शहरात आला होता. त्याची एक झलक बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. येथील पड्डल मैदानावर आयोजित कार्यक्रमात सलमानने या शहरासाठी काही करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमानने येथे बीईंग ह्युमन या संस्थेचे काम येथे सुरु केले आहे. या एनजीओचे काम हिमाचलमध्ये आश्रय सांभाळतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गौतमची चुलत बहीण आणि आश्रयची छायाचित्रे...