'प्रेम रतन धन पायो' सिनेमाचे नवीन रोमँटिक गाणे 'जलते दिये' रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये सिनेमाची मुख्य जोडी अर्थातच सलमान खान आणि सोनम कपूर यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसली आहे.
गाण्याला संगीत हिमेश रेश्मियाने दिले आहे आणि लिरिक्स इरशाद कामिलने लिहिले आहे. गाण्याला अनवेशा, विनीत सिंह, हर्षदीप कौर आणि सबाब सबरीने आवाज दिला आहे. यापूर्वीसुध्दा सिनेमाची दोन गाणी रिलीज झाली आहेत.
दिग्दर्शक सूरज बडजात्याच्या हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर अर्थातच 12 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्यातील सलमान-सोनमचा अंदाज... आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा व्हिडिओ...