आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुल्तान'चा नवीन टीझर रिलीज, हरियाणाच्या 'शेरनी'ने रेसलर्सना केले चीतपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सुल्तान'च्या पोस्टरवर अनुष्का शर्मा - Divya Marathi
'सुल्तान'च्या पोस्टरवर अनुष्का शर्मा
मुंबई: अनुष्का शर्माच्या बर्थडेनिमित्त 'सुल्तान' या आगामी सिनेमाचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमात अनुष्का 'हरियाणाची शेरनी' आरफाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये तिचे अनेक फाइल सीन आहेत. त्यात ती दुस-या रेसलर्सना चीतपट करताना दिसत आहे. पहिला टीझर पूर्णत: सलमान खानवर आधारित होता. त्यात त्याच्या भूमिकेला 'हरियाणा का शेर' म्हटले होते.
टीझरमध्ये महिला सशक्तीकरणचा मुद्दा...
- नवीन टीझरमध्ये महिला सशक्तीकरणची झलक दाखवण्यात आली आहे.
- टीझरच्या सुरुवातीचा डायलॉग 'इस देश की जान इस देश की लेडीज है। बात कुछ अलग सी है इणकी। जितनी कोमल ये लागे है न...उससे कई ज्यादा ताकत है इनके बाजुओ मे। हम मर्द माणे या न माणे, पर सच यही है'ने होते.
- टीझरच्या शेवटी अनुष्काच्या पात्राचा परिचय करून देण्यात येतो. बॅकग्राऊंडमध्ये आवाज येतो, 'यो सै हरियाणा की शेरणी और सुल्तान की जाण आरफा'
- अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टीझरमधून अनुष्काचे घेण्यात आलेले फोटो...शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...