आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Guns Blazing: Shilpa Shinde Lambasts Producers Of Bhabi Ji Ghar Par Hai In Press Conference

‘अंगुरी भाभी’च्या मदतीला धावले मनसेचे खाेपकर, निर्मात्‍याला दिला दम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिला हिंदी मालिकांत काम करण्यास कोणी रोखल्यास आम्ही आमच्या पद्धतीने त्याला उत्तर देऊ, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गुरुवारी दिला. शिल्पा हिने मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर खोपकर यांनी हा इशारा दिला.

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या "भाभीजी घर पर है' या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका शिल्पा करत होती. मात्र, निर्मात्यांशी वाद झाल्याने तिने ही मालिका सोडली. त्यानंतर तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आले. त्यानंतर टीव्ही कलाकारांची संस्था असलेल्या सीआयएनटीएएने तिला कायदेशीर नोटीस पाठवली. त्यामुळे शिल्पा हिने मनसेचा आसरा घेतला. खोपकर म्हणाले, हिंदी चित्रपटसृष्टीत सातत्याने मराठी कलाकारांवर अन्याय होत आहे.
"भाभीजी'च्या निर्मात्यांनी शिल्पा हिला दुसऱ्या मालिकांत काम करण्यास मज्जाव केला आहे. तिला कोणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास आमच्या पद्धतीने त्याला उत्तर देऊ. जर कोणी याला धमकी समजत असेल, तर त्याने तसे समजावे, असेही ते म्हणाले. "भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी शिल्पाच्या ऐवजी आता शुभांगी अत्रे हिला साइन करण्यात आले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा शिल्‍पा शिंदेचे फोटोज...