आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदीची मागणी फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका पुण्याचे दिवाणी वरिेष्ठ न्यायाधीश एस.एस. गुलानी यांनी फेटाळून लावली. तसेच याचिकाकर्त्यांना या मागणीसाठी सेन्सॉर बोर्डाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

हा चित्रपट खोट्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असून लोकांच्‍या भावना त्यामुळे भडकून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दिग्दर्शकाने चित्रपट बनवला असल्याने त्यावर बंदी टाकावी अशी मागणी हेमंत पाटील व फिरोज शेख यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यांचे वकील वाजेद खान-बीडकर यांनी सांगितले की, ‘न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाकडे जाण्याचा सल्ला दिला असला तरी सदर चित्रपटास बोर्डाने परवानगी दिली आहे. चित्रपटावर घेण्यात येणाऱ्या आक्षेपांवर संथगतीने कारवाई होत असल्‍याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे. त्यामुळे याप्रकरणी आम्‍ही शुक्रवारी सत्र न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी टाकण्यात यावी ही मागणी पुन्हा करणार आहोत.’