आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ली लोक अतिसंवेदनशील झालेत, अभिनेत्री काजोलचा टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - देशात वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर दिग्दर्शक करण जोहरच्या वक्तव्याने पुन्हा वादावादी सुरू झाली आहे. मात्र बॉलीवूड अभिनेत्री काजोलने हा मुद्दा खोडून काढला आहे. बॉलीवूडमध्ये अशी कोणतीही भेदभावात्मक रेषा नाही. हल्ली लोक खूपच अतिसंवेदनशील झाले असल्याचा टोलाही तिने लगावला.

वाचनाचा छंद असलेली काजोल जयपूर साहित्य महोत्सवात तिसऱ्या दिवशी लेखक अश्विन सांघी यांचे ‘द सियालकोट सागा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी आली होती. ती म्हणाली, आपल्या समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब चित्रपटांत उमटते. बॉलीवूडमध्ये भेदभाव करणारी कोणतीही रेषा नाहीत, ना जातपात, ना वंशभेद आणि ना असहिष्णुता. दिग्दर्शक करण जोहरने ‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सर्वात मोठा विनोद आहे,’ असे वक्तव्य केले होते. त्यावर काजोल म्हणाली, आजकाल लोक अतिसंवेदनशील झाल्यासारखे दिसतात. सार्वजनिक व्यक्तिमत्त्वे म्हणून योग्य आणि स्पष्ट बोलावे हे आमचे कर्तव्य आहे. मी नेहमीच माझी ‘मन की बात’ सांगितलेली आहे. आजही त्यात तसूभरही बदल झाला नाही. काही महिन्यांपूर्वी शाहरुख व आमिर खान यांच्या असहिष्णुतेबाबतच्या मतावरून वाद निर्माण झाला होता.
...अजयशी लग्न!
काजोल म्हणाली, अजय देवगणने मला ‘द ब्यूटी अँड द बीस्ट’ या हॉलीवूड चित्रपटात असलेल्या ग्रंथालयासारखे ग्रंथालय उभारून देण्याचे वचन दिले होते. यानंतर मी त्याच्यासोबत लग्नास होकार दिला. आपल्या खोलीत एक आणि घरात एकूण तीन ग्रंथालये असल्याची माहितीही तिने दिली.