आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्का विवाहाची मिलानमध्ये तयारी; मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलातही स्वागत सोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- क्रिकेट विश्वाचा सध्याचा ग्लॅमरबॉय विराट कोहली आणि सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचे वृत्त गुप्त ठेवण्यात आल्यानंतरही बाहेर फुटलेच. फॅशन विश्वात प्रथमस्थान असलेल्या इटलीमध्ये मिलान शहरात हे बहुचर्चित प्रेमीयुगुल विवाहबंधनात अडकत असल्याच्या वृत्ताला आता सगळीकडून दुजोरा मिळत आहे. मूळची दिल्लीची अनुष्का शर्मा हिची कर्मभूमी मुंबईच असून सिनेसृष्टीतील आपल्या हितचिंतक-मित्रमैत्रीणींसाठी खास अनुष्काच्या आग्रहास्तव मुंबईच्या जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये २० डिसेंबरनंतर स्वागत समारंभ आयोजित करण्यात आल्याचे वृत्त आहे.


मैदानावर आपल्या बेधडक आणि बिनधास्त फलंदाजीने आणि वर्तणूकीने प्रसिद्धीस आलेला विराट आणि बॉलिवूडची स्टार अनुष्का शर्मा यांच्या ‘इष्काच्या’ अनेक गोष्टीही गाजल्या.
रोमियो आणि ज्युलिएटच्या प्रेमकथा ज्या ‘वेरोना’ शहरात चर्चिल्या जातात, त्या वेरोना येथील ‘लव्ह स्पॉट’ला हे युगुल भेट देणार आहेत, असेही वृत्त आहे. वेरोना येथील ज्युलिएटच्या पुतळ्याभोवतालच्या साऱ्या वास्तूंवर प्रेमी युगुलांनी एकमेकांसाठी लिहिलेले संदेश, चिठ्ठ्या, प्रेमपत्र यांचा खच सापडतो. ज्युलिएटचे घर, गॅलरी आणि साऱ्या परिसरातील भिंतींवर सर्वत्र प्रेमसंदेश डकविलेले सापडतात. या जागी जाण्याचा इरादा या जोडीचा आहे.


खरं तर विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत खेळायचे नव्हते. मात्र स्वगृही (दिल्ली) बऱ्याच वर्षानंतर होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याचा आग्रह झाल्यामुळे त्याला दिल्ली कसोटीत खेळावे लागले.


अनुष्का शर्माला विवाहबंधनात अडकण्याआधी करिअरची  काळजी होती. या दोघांच्या लग्नाप्रमाणेच हनीमूनला कुठे जाणार याबाबतही चर्चा आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या दक्षिण आफ्रिकेच्या व्हिसासाठीच्या अर्जापाठोपाठ अनुष्का शर्मानेही दक्षिण आफ्रिकेच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे असे कळते. विराट-अनुष्का यांना प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहून विवाह करण्यात स्वारस्य होते. त्यामुळे इटलीयेथील विवाहसोहोळ्यासाठी दोघांचे फक्त जवळचे नातेवाईकच उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे क्रिकेटपटू राजकारणी, फिल्म क्षेत्रातील व्यक्ती व कॉर्पोरेट संबंधितांसाठी विराट-अनुष्का यांनी  मुंबईतील जुहूस्थित पंचतारांकित हॉटेलमध्ये २० डिसेंबरनंतर हा सोहोळा संपन्न होणार आहे, असेही विश्वसनिय वृत्त आहे.

 

पुढे वाचा, अनुष्का विराटने घेतली होती महाराज अनंत बाबांची भेट.. सोबतच अनुष्का-विराटची लव्ह स्टोरी...

बातम्या आणखी आहेत...