आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूक बदलून लवकरच येतोय 'शक्‍तिमान', वाचा काय म्‍हणाले मुकेश खन्ना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘रा.वन’बनून बावळट चाळे करणारा शक्तिमान साकारूच शकणार नाही. त्यासाठी मुकेश खन्नाच हवा, असे सडेतोड बोल भारतातील पहिला सुपरहीरो ठरलेला अभिनेता मुकेश खन्ना याने व्यक्त केले आहे. नव्वदच्या दशकात बच्चे कंपनीला वेड लावणारी ‘शक्तिमान’ ही मालिका नव्या दमाने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता मुकेश खन्नाशी विवेक एम. राठोड यांनी साधलेला संवाद.
प्रश्‍न - ‘शक्तिमान’ पुन्हा बच्चे कंपनीच्या भेटीला आणताय...
मुकेश खन्ना : तब्बल दशकभर शक्तिमानने बच्चे कंपनीसह वडीलधाऱ्यांचेही मनोरंजन केले. मुलांना समजावून सांगण्यासाठी लोक शक्तिमानच्या नावाचा वापर करू लागले. त्यामुळे या मालिकेचे अत्यंत वेगळे महत्त्व आहे. माझ्या हृदयाशी जुळलेला विषय असल्याने मी मागच्या तीन वर्षांपासून शक्तिमानला पुन्हा पडद्यावर आणण्यासाठी मेहनत घेतोय. सर्व तयारी जवळपास झाली असून लवकरच तो प्रसारित होईल.

- नव्या शक्तिमानमध्ये कोणकोणते बदल असतील?
मुकेश खन्ना : गंगाधर, शक्तिमान, गीता विश्वास, किलविश सर्व काही तेच असणार आहेत. तंत्रज्ञान इफेक्टमध्ये बराच बदल असेल. पूर्वी मुलांच्या सवयी जीवनशैलीशी निगडित होत्या. त्यांना द्यावा लागणारा संदेशही सवयींबाबतच होता. मात्र, आता तंत्रज्ञान, इंटरनेटमुळे मुलांच्या सवयी वेगळ्याच बनल्या आहेत. त्यामुळे आता आम्हाला संदेशही बदलावे लागणार आहेत. मी १५ किलो वजन घटवले असून वैष्णवी महंतलाही (गीता विश्वास) सौंदर्यावर काम करायला लावले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मुकेश खन्‍ना यांनी आणखी काय सांगितले..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...