आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला पत्रकारांंना पार्श्वगायक अभिजीतचे आक्षेपार्ह ट्वीट, पोलिसांकडून दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकप्रिय पार्श्वगायक अभिजीत पुन्हा एकदा वादात सापडण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यांनी एका महिला पत्रकार विषयी आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. हे प्रकरण मुंबई पोलिस आणि सायबर क्राईम विभागाकडे जाण्याची शक्यता आहे.
पत्रकार स्वाती चतुर्वेदी व जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांना अभिजीत यांनी आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. चेन्नईमधील अभियंता तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुस्लिम असल्याचा दावा करत अभिजीत यांनी ट्वीट केले आहे. मात्र, रिपोर्टनुसार संशयित आरोपी मुस्लिम नाही. त्‍यामुळे अभिजीत हे धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्वीट स्वाती चतुर्वेदी यांनी केले. मुंबई पोलिसांना मेन्शन करुन अभिजीत विरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली.
संतापलेले अभिजीत काय म्‍हणाले..
- अभिजीत चांगलेच संतापले व त्‍यांनी स्‍वाती यांना शिवीगाळही केली.
- स्‍वाती यांच्‍याबाबत त्‍यांनी ‘निर्लज्ज म्हातारे’ अशा शब्दात ट्विट केले.
- तू पाकिस्तानींचे पंजे चाटत असल्याचे म्हणत त्‍यांनी शिवीगाळही केली.
- जनताकारिपोर्टर.कॉमच्या मुख्य संपादक रिफात जावेद यांनी या वादात उडी घेतली.
- रिफात यांनी ‘किती संस्कारी आहात’ असा खोचक टोला लगावला.
- यावर अभिजीत यांनी लिहीले, ‘हो आम्ही भारतीय पाकिस्तानींना लाथ मारतो, हेच आमचे संस्कार आहेत’.
- मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवण्याचे सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आक्षेपार्ह ट्विट्स..
बातम्या आणखी आहेत...