आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेरी कोम’, ‘बिग बॉस’चा सेट बनविणारा सिद्धू सोलापूरचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मेरी कोम चित्रपटाचा सेट असो की सलमान खान फेम बिग बॉसचा सेट असो नाना प्रकारच्या मोठ्या लाईव्ह शोचे सेट करणारा साहाय्यक कलादिग्दर्शक सिद्धाराम पाटील हा मूळचा सोलापूरचा आहे. पदवीचे शिक्षण घेतलेल्या सिद्धारामने कष्टाच्या बळावर मुंबईत आपले पाय घट्ट रोवले आहेत. तो सध्या झलक दिखला जा शोचे ओमंग कुमार यांचा साहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम करतो.
२००४ मध्ये मुंबईत एका छोट्याशा प्रिंटिंग प्रेेसमध्ये काम करत सिद्धारामने सुरुवात केली. दोन वर्षांनंतर प्रेस बंद पडली. दरम्यान त्याची आवड लक्षात घेत चित्रपटाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुक्तार पठाण या अकलूजच्या मित्राने त्याला दिल्लीच्या कॉमन वेल्थचे सेट करण्याचे काम दिले. ते त्याचे पहिलेच काम होते. त्यानंतर त्याने विविध वाहिन्यांसाठी ‘रिअॅलिटी शो’चे सेट तयार केले. त्यात तो आपल्या कल्पकतेने गुरू विवेक भालेराव यांच्या मदतीने पुढे जात राहिला. पैसा, नाव आणि प्रसिद्धी हे सारे काही मिळवत त्याने कलादिग्दर्शन या क्षेत्रात वेगळे नाव निर्माण केले.
हे काम करतो सिद्धाराम
कलादिग्दर्शन म्हणजे एखाद्या चित्रपटाचे, मालिकेचे सर्व साहित्य जमा करण्याचे मंच उभा करण्याचे काम होय. ‘मेरी कोम’चा बॉक्सिंगचा सेट, ‘झलक दिखला जा’चा सजविलेला सेट, त्यावर हवे असलेले सर्व साहित्य हे सिद्धाराम त्याच्या सहकाऱ्यांनी नेटकेपणाने सजवले. ‘बिग बॉस’चे काम लोणावळ्याच्या एका घरात सुरू असे. मात्र त्यात लागणाऱ्या सर्व वस्तू सेटचे काम हे सिद्धाराम आणि त्यांचे सहकारी करत असत.
मेरी कोम बिग बॉस मैलाचा दगड
सिद्धारामच्या आयुष्यात सलमान खानचा बिग बॉस शो आणि प्रियांका चोप्राचा मेरी कोम चित्रपट या दोन कलाकृती मैलाचा दगड ठरले. त्याला अनेक गोष्टी शिकता आल्या. पुन्हा नव्याने कामे मिळत गेली. इंडस्ट्रीत एक नवी ओेळख झाली.
लहानपणापासून आवड
- चित्रपटसृष्टीचे वेध लहानपणापासूनच होते. मंुबईच्या चंदेरी दुनियेचे वेड जोपासताना नित्याने फिल्मसिटी हा कार्यक्रम पाही. त्यातूनच मी पुढे या क्षेत्राची निवड केली. घरच्यांचा विरोध असतानाही आपले नशीब आजमाविले. पुढे दिग्दर्शक हाेण्याचे स्वप्न आहे. खूप आनंद मिळतो आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत असल्याचा.”
सिद्धाराम पाटील, युवा कलादिग्दर्शक
बातम्या आणखी आहेत...