आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airlift मध्ये उडवली सचिनची खिल्ली, त्याकाळात जगभरात चर्चेत होता तेंडल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर (डावीकडे). एअरलिफ्टचे पोस्टर. - Divya Marathi
सचिन तेंडुलकर (डावीकडे). एअरलिफ्टचे पोस्टर.
एअरलिफ्टच्या एका सीनमध्ये बगदादमध्ये भारतीय दुतावासाचे अधिकारी सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीची खिल्ली उडवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात अक्षय कुमार ज्यावेळी मदतीसाठी कुवेतहून बगदादला जातो. त्यावेळी भारतीय दुतावासाचा एक अधिकारी अक्षयकडे दुर्लक्ष करत टिव्हीवर सुरू असलेल्या कसोटी सामना पाहत असतो. याच वेळी अधिकाऱ्याच्या तोंडी ' यार, किस बच्चे को उठा लाए हैं, कभी 10 रन पर आउट होता है तो कभी 27 पर, असा डायलॉग आहे. हा अधिकारी ते सचिनबाबत बोलत असतो.

त्यावेळी सचिनने खेळलेल्या खेळी...
- गल्फ वॉर 2 ऑगस्ट 1990 पासून 28 फेब्रुवारी 1991 पर्यंत चालले होते. या काळामध्ये सचिन हिट झालेला होता. त्याचे सगळीकडे नाव झालेले होते.
- सचिनने 16 व्या वर्षी 1989 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर फेब्रुवारी 1991 पर्यंत सचिनने कसोटीत 4 अर्धशतक आणि 1 शतक ठोकलेले होते.
- सर्वात रंजक बाब म्हणजे हे शतक गल्फ वॉर सुरू होण्याच्या काळात इंग्लंडच्या विरोधात ठोकले होते. 9 ऑगस्टच्या सामन्यात सचिनने या नाबाद 119 धावा केल्या होत्या.
- सचिनच्या फलंदाजीचे तंत्र पाहून त्याकाळात संपूर्ण जगातील क्रिकेटविश्वात त्याची चर्चा होती. चित्रपटात मात्र त्याच्यावर टीका करण्यात आली आहे.

कौतुकही करू शकत होते...
- हा बॉलीवूडचा चित्रपट आहे तर सचिन क्रिकेट लेजंड आहे. त्याच्या क्रिकेट कौशल्यामुळे जगभरात त्याचा आदर केला जातो. त्यामुळे चित्रपटात घटना दाखवायचीच होती तर मग सचिनचे कौतुकही करता आले असते.
- अक्षय कुमारचे पात्रही पाच कॅरेक्टरचे मिळून तयार करण्यात आले आहे. हे काल्पनिक कॅरेक्टर आहे. चित्रपट अधिक रंजक व्हावा म्हणून तसे करण्यात आले आहे. त्यामुळेच सचिनवर टीका करण्याऐवजी त्याचे कौतुक करायला हवे होते.
- विशेष म्हणजे सचिन त्यावेळी पूर्णपणे हीट झालेला होता हेही सत्य आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, गल्फ वॉरपूर्वी सचिनने क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी...