आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलात्मकतेकडे ओढा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ राज कपूर तद्दन व्यावसायिक चित्रपट तयार करीत असताना शशी कपूर यांनी मात्र व्यावसायिक चित्रपटांबराेबरच कलात्मक चित्रपटांची निर्मिती करीत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता. कपूर घराण्यात शशी कपूर यांनीच सगळ्यात जास्त इंग्रजी चित्रपटांत काम केले. व्यावसायिक चित्रपटातून मिळणारा पैसा त्यांनी कलात्मक चित्रपट आणि नाट्यदेवतेच्या भरभराटीसाठी लावला. त्यांचे हे वेगळे रूप म्हणूनच उल्लेखनीय ठरते. 

 
लहानपणापासूनच नाट्यक्षेत्राशी आणि नंतर कलात्मक इंग्रजी चित्रपटांशी जवळचा संबंध आल्याने शशी कपूर यांना काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. पत्नी जेनिफरही व्यावसायिक चित्रपटांऐवजी कलात्मक चित्रपटांकडेच लक्ष देत असे. त्यामुळे शशी यांनी शेक्सपियरवाला नावाने वेगळी कंपनी स्थापन केली. कलात्मक चित्रपट तयार करण्यासाठी त्यांनी श्याम बेनेगलसह अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केले. श्याम बेनेगल यांच्याबरोबर त्यांनी ‘जुनून’, महाभारतावर आधारित ‘कलयुग’ या चित्रपटांची निर्मिती केली.

 

जुनून चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला, परंतु ‘कलयुग’ला तसे यश मिळाले नाही. तरीही शशी कपूर यांनी वेगळ्या चित्रपटनिर्मितीचा मार्ग सोडला नाही. अपर्णा सेन यांच्याबरोबर ३६ चौरंगी लेन चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. पत्नी जेनिफरच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाची प्रचंड प्रशंसा झाली. गोविंद निहलानी यांच्याबरोबर त्यांनी ‘विजेता’ आणि गिरीश कर्नाड यांच्यासोबत ‘उत्सव’ चित्रपट केले. रेखा आणि शेखर सुमन अभिनित ‘उत्सव’ची कथा खूपच चांगली होती, परंतु शेखर सुमन आणि रेखामधील प्रणय दृश्यांमुळेच हा चित्रपट ओळखला गेला. या चित्रपटांच्या निर्मितीत शशी कपूर यांनी चांगलाच पैसा गमावला खरा, परंतु चांगली कलाकृती निर्माण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसत असे.   

बातम्या आणखी आहेत...