Home | News | Newton Selected Indian Official Entry To The Oscars, Rajkummar Rao Has Tweeted

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘न्यूटन’ ऑस्कर शर्यतीत; मराठमोळ्या अमित मसूरकरवर अभिनंदनाचा वर्षाव

विशेष प्रतिनिधी | Update - Sep 23, 2017, 12:24 PM IST

भारतातील निवडणूक प्रक्रियांवर निशाना साधत त्याच्यावर व्यंगात्मक टीका करणारा

 • Newton Selected Indian Official Entry To The Oscars, Rajkummar Rao Has Tweeted
  मुंबई- मराठमोळा दिग्दर्शक अमित मसूरकर याने दिग्दर्शित केलेला आणि राजकुमार रावची भूमिका असलेला ‘न्यूटन’ हा हिंदी चित्रपट भारतातर्फे ऑस्कर २०१८ पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला जाणार आहे. भारतातील निवडणूक प्रक्रियेवर ‘चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होताच टीमला याबाबत खुशखबर मिळाली.

  फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात शुक्रवारी अधिकृत घोषणा केली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने सी. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या १४ सदस्यीय समितीने हा निर्णय घेतला. ऑस्कर २०१८ च्या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात भारतातर्फे अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यासाठी एका चित्रपटाची निवड करण्यासाठी समितीने विविध भाषांतील सुमारे २६ भारतीय चित्रपट बघितले. त्यातून न्यूटन चित्रपटाची एकमताने निवड करण्यात आली. ९० व्या अकादमी पुरस्कारांसाठी विविध विभागांकरिता जगभरातील अनेक देशांनी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवलेल्या चित्रपटाचे खेळ मार्चमध्ये कॅलिफोर्नियातील लॉस एंजलिस येथील हॉलीवूडच्या चित्रपटगृहांत होतील. हॉलीवूडच्या ज्युरींमार्फत परीक्षण होईल. न्यूटन चित्रपटाचा खेळ हॉलीवूडचे ज्युरी ४ मार्च रोजी पाहणार आहेत. त्यानंतर नामांकनावर निर्णय करायचे की नाही याचा निर्णय होईल.
  लोकशाहीच्या मजबुतीसाठी न्यूटनचा हातभार लागू दे
  लोकशाही मजबूत होण्यासाठी ‘न्यूटन’ चित्रपट मोलाचा हातभार लावेल, अशी अपेक्षा असल्याचे दिग्दर्शक अमित मसूरकर म्हणाला. अमित माहीम भागात वाढलेला मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलगा. त्याचे वडील एका औषध कंपनीत काम तर आई डेस्कटॉप पब्लिशिंग आणि डिझायनिंग या क्षेत्रात आहे. त्याने चार दिन की चांदनी (२०१२), मर्डर ३ (२०१३) हे चित्रपट तसेच द ग्रेट इंडियन काॅमेडी शो या मालिकेचे लेखनही केले आहे.
  पुढच्या स्लाईडवर पाहा, राजकुमारने केलेले ट्वीट...

 • Newton Selected Indian Official Entry To The Oscars, Rajkummar Rao Has Tweeted
  राजकुमारने केलेले ट्वीट
 • Newton Selected Indian Official Entry To The Oscars, Rajkummar Rao Has Tweeted
  न्यूटन चित्रपट दिग्दर्शक अमित मंसूरकर


    

Trending