Home »News» Nia Sharma Beats Deepika Padukone To Become Asian Sexiest Woman

दीपिका पदुकोणला पछाडत ही टीव्ही अॅक्ट्रेस बनली Sexiest Woman, फोटोजमध्ये बघा ग्लॅमर

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 13:30 PM IST


अभिनेत्री प्रियांका चोप्रा 2017 ची आशियातील सर्वात सेक्सी महिला ठरली आहे. यापूर्वी हा किताब अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याकडे होता. प्रियांका चोप्राने दुस-यांदा हा किताब पटकावला आहे. 2015 मध्ये प्रियांका या यादीत पहिल्या स्थानी होती, तर मागील वर्षी दीपिका पदुकोणने या यादीत पहिले स्थान मिळवले होते. लंडनचे इस्टर्न आय हे दैनिक दरवर्षी ही यादी जाहीर करत असते.

2017 च्या '50 सेक्सिएस्ट एशियन वुमन'च्या यादीत प्रियांकानंतर टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हिने दुसरे स्थान पटकावले आहे. तर दीपिका पदुकोण तिस-या स्थानी आहे. म्हणजेच निया दीपिका पदुकोणला पछाडत आशियातील सर्वात सेक्सी महिला ठरली आहे. 27 वर्षीय नियाने अभिनय करिअरची सुरुवात स्टार प्लसच्या 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेतून केली होती. त्यानंतर ती झी टीव्हीच्या 'जमाई राजा' या मालिकेत झळकली. निया 'खतरों के खिलाडी 8' शिवाय वेब सीरीज 'ट्विस्टेड'मध्येही दिसली आहे.


निया सोशल मीडियावर लोकप्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर तिरा 1.4 लाख यूजर्स फॉलो करतात. निया तिच्या ग्लॅमरस फोटोशूट्समुळे नेहमी चर्चेत असते. टीव्ही मालिकांमध्ये अतिशय सिंपल लूकमध्ये दिसणारी निया खासगी आयुष्यात मात्र अतिशय ग्लॅमरस आहे.


पाहुयात, आशियातील सेक्सी महिला ठरलेल्या निया शर्माचे ग्लॅमरस रुप छायाचित्रांमध्ये...

Next Article

Recommended