आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली: रस्त्यावर असे फिरले अमिताभ, पण कोणीच ओळखू शकले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमिताभ बच्‍चन यांनी शनिवारी शुजीत सरकारच्‍या नवीन चित्रपटासाठी शूटिंग केली. ते मास्क लावून दिल्‍लीच्‍या रस्‍त्यांवर फिरले पण त्‍यांना कोणी ओळखू शकले नाही. शुक्रवारी त्‍यांनी या चित्रपटाची एक इमेजही ट्विटरवर शेयर केली होती. मात्र, त्‍यांनी चित्रपटाचे नाव सांगितले नव्‍हते. पांढरे केस नि लांब पांढ-या दाढीत दिसले अमिताभ..
- शनिवारच्‍या शूटिंगमध्‍ये अमिताभ पांढरे केस नि लांब पांढ-या दाढीमध्‍ये दिसले.
- त्‍यांनी खाकी ट्राउजर आणि लूज फिटेड शर्टसेाबत जाकीटही घातले होते.
- त्‍यांनी मास्‍कने चेहरा अर्धा झाकला होता.
- अशा कपड्यांमध्‍ये ते कित्‍येक वेळ रस्‍त्यांवर फिरले, पण त्‍यांना कोणी ओळखले नाही.
शुक्रवारी केले होते ट्विट..
- ट्विटरवर त्‍यांनी लिहीले होते की, पुढच्‍या फिल्‍मच्‍या शूटिंगचा एक फोटो..कलरफुल.
- विशेष म्‍हणजे हा फोटो ब्‍लॅक अॅन्‍ड व्‍हाइट होता, तर त्‍यांनी कलरफुल का लिहीले?
- त्‍यांच्‍या चाहत्‍यांनी अंदाज बांधला की, हेच तर चित्रपटाचे नाव असेल.
- या चित्रपटाचे नाव 'ईव' आहे अशा बातम्‍या होत्‍या. पण अमिताभ यांनी गुरुवारी ब्लॉगमध्‍ये सांगितले की, शुजीत सरकार यांच्‍या चित्रपटाचे नाव ईव नाही.
शुजीत यांच्‍यासोबत हा तिसरा चित्रपट..
- अमिताभ आणि शुजीत सरकार यांचा हा तिसरा चित्रपट असणार आहे.
- त्‍याआधी त्‍यांनी पीकूमध्‍ये काम केले. यामध्‍ये दीपिका पदुकोणही होती.
- अमिताभ यांनी शुजीत यांच्‍या शूबाइट या चित्रपटातही काम केले आहे. मात्र, हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नाही.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा... शूटिंगदरम्‍यानचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...