आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरबाजच्या कारमध्ये बसण्यास मलायकाचा नकार, घटस्फोटाच्या सुनावणीसाठी पोहोचले होते कोर्टात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खान आणि वहिनी मलायका अरोरा खान यांच्यात सारंकाही आलबेल होईल असे चित्र दिसत नाहीये. त्याचे कारण म्हणजे मंगळवारी सकाळी दोघेही मुंबईतील वांद्रा कोर्टात घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आले होते. दोघांनाही कोर्टाने काउंसिलिंगसाठी बोलावले होते. दोघेही आपापल्या कारमधून कोर्टात पोहोचले. मात्र जेव्हा मलायका कोर्टाबाहेर पडली तेव्हा अरबाजने तिला त्याच्या कारमध्ये बसण्याची विनंती केली. मात्र अरबाजकडे दुर्लक्ष करत मलायका स्वतःच्या गाडीतून तेथून निघून गेली. मीडियासोबत बोलण्यास दिला नकार...

divyamarathi.com ने अरबाज आणि मलायकासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोघांनीही बोलण्यास नकार दिला. याच महिन्यात दोघांनीही वांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. दोघांनीही कोर्टात त्यांच्या वकिलांची भेट घेतली.
अरबाज-मलायकाने सामंजस्याने घेतला घटस्फोटाचा निर्णय...
गेला काही काळ अरबाज आणि मलायकाच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्यानंतर आता पुन्हा हे दोघंही त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि मुलांसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण तसे काहीही झालेले नाही. या दोघांनीही याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मलायकाला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अरबाज-मलायकाच्या 18 वर्षांचा सुखी संसार संपुष्टात येत आहे.
सलमानकडून पॅच अपचा प्रयत्न...
अरबाज आणि मलायका एकमेकांपासून दुरावत असल्याची बातम्या आल्यानंतर, त्यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी सलमान खान मदत करत होता. सलमानने यासाठी 2 मार्चला फॅमिली पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला त्याने बहिण अमृता आणि तिचा पती, मलायकाची आई, तसंच मलायकांचे जवळचे नातेवाईक शकील लडाक यांना आमंत्रित केलं होतं. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतरही सलमानने जिद्द सोडली नव्हती. त्याने कलर्स गोल्डन अवॉर्डमध्येही मलायकाच्या बाजूला बसून चर्चा केली होती.

सलीम खान यांचा हस्तक्षेप नाही...
अरबाज आणि मलायकाच्या दुराव्याबाबत वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांनी बोलणं टाळलं “मी एक लेखक आहे. मला कोणाच्याही लव्ह-अफेअर आणि ब्रेकअप विषयी विचारु नका. मी माझ्या मुलांच्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ करत नाही,” मला याबाबत काहीही बोलायचं नाही, असं सलीम खान म्हणाले. तर मलायकाची आई जोएस पॉलिकॉर्प यांनी तुटणाऱ्या नात्याविषयी बोलणं टाळलं. दोघेही समजूतदार आहे आणि हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मला त्यांच्यात पडायचं नाही. शिवाय यासंदर्भात मीडियाशीही बोलायचं नाही, असं जोएस पॉलिकॉर्प म्हणाल्या.

वादग्रस्त जाहिरातीतून एकत्र आले होते अरबाज-मलायका...

1993 मध्ये मिस्टर कॉफी या जाहिरातीच्या चित्रीकरणावेळी मलायका-अरबाजचे सूत जुळले होते. मात्र ही अॅड खूप बोल्ड असल्याने त्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दोघे एका अल्बममध्येही एकत्र झळकले होते. 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी 1997 मध्ये लग्न केले होते.

अरबाजपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे मलायका...
मलायका अरबाजपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे. तिचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी चेंबुर (मुंबई) येथे झाल. तर अरबाजचा जन्म 4 ऑगस्ट 1967 रोजी पुण्यात झाला. मलायका प्रसिद्ध अभिनेत्री, डान्सर आणि वीजे आहे. तर अरबाजला प्रॉडक्शन, डायरेक्शन आणि अॅक्टिंगसाठी ओळखले जाते. मलायका लग्नाच्या आधीपासूनच ख्रिश्चन धर्माला फॉलो करते. तिचे वडील पंजाबी अरोरा फॅमिलीतून आहेत, तर आई कॅथलिक आहे. मलायका 18 वर्षांची असताना तिची अरबाजसोबत पहिल्यांदा भेट झाली होती.

मलायकावर खूप प्रेम करतो – अरबाज
यापूर्वी मलायकासोबतच्या टेलिव्हिजन शो ‘यार मेरा सुपरस्टार’मध्ये अरबाज म्हणाला होता, “असं असतं की, जेव्हा तुम्हाला काहीतरी मिळवायचं असतं, तेव्हा ते गमावण्याची तुम्हाला भीती वाटत असते. मी मलायकावर खूप प्रेम करतो, मात्र तिला गमावण्याची भीती वाटते.”
पुढील स्लाईड्समध्ये बघा, अरबाज-मलायकाची कोर्टाबाहेर पडतानाची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडमध्ये व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...