आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nude Body Found With Injury On Head: Interview Of Om Puri\'s Driver Ram Pramod Mishra

ओम पुरींच्या ड्राइवरचा खुलासा : किचनमध्ये आढळली होती न्यूड बॉडी, टीव्ही-एसी होता सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्रायव्हर राम प्रमोद मिश्रासोबत ओम पुरी - Divya Marathi
ड्रायव्हर राम प्रमोद मिश्रासोबत ओम पुरी
 
मुंबईः ओम पुरी यांचा मृत्यूनंतर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या डोक्यात जखम असल्याचे आढळून आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. शनिवारी ओम पुरी यांचे ड्रायव्हर राम प्रमोद मिश्रा आणि प्रोड्यूसर खालिद किडवई यांना समोरा-समोर बसवून तीन तास चौकशी करण्यात आली. ओम पुरींची डेड बॉडी बघणारे राम प्रमोद मिश्रा हे पहिले होते. मृत्यूच्या आदल्या रात्री मिश्रा यांनीच ओम पुरींना घरी सोडले होते. Dainikbhaskar.com सोबत केलेल्या बातचीतमध्ये मिश्रांनी ओम पुरी यांच्या निधनानंतरची परिस्थिती सांगितली. शुक्रवारी 66 वर्षीय ओम पुरीं संशयास्पद मृत्यू झाला होता. 

किचनमध्ये नग्नावस्थेत आढळला होता ओम पुरींचा मृतदेह...
- मिश्रा यांनी सांगितल्यानुसार, “5 जानेवारीच्या (गुरुवार) रात्री साडे आठच्या सुमारास ओम पुरी यांना अॅम्बेसीला जायचे होते. साडे सात वाजता ते निघाले. यावेळी निर्माते खालिद किदवई त्यांच्यासोबत होते.”
- “शुक्रवार सकाळी 6.30 वाजता खालिद यांचा मला फोन आला. ते म्हणाले पुरी यांची पर्स त्यांच्या (खालिद यांच्या) कारमध्ये राहिली आहे.”
- “साहेबांनी (ओम पुरी)  मला त्यांना सकाळी उठवायला सांगितले होते. सकाळी 7 वाजता मी त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले. खूप वेळा दार वाजवले, पण कुणीही दार उघडले नाही.”
- “ साहबांनी त्यांच्या फ्लॅटची एख चावी शेजा-यांकडे ठेवली होती. शेजा-यांच्या मदतीने मी दार उघडले. टीव्ही आणि एसी चालू होता. ते किचनमध्ये पडले होते.”
- “ ते विवस्त्र होते. डोक्यावर जखम होती. मी तातडीने काही लोकांना फोन केला आणि अॅम्बूलन्स मागवली.”

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आहे?
- सूत्रांनी DainikBhaskar.com ला पुरी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची माहिती दिली. त्यानुसार, पुरी यांच्या डोक्याला दीड इंच खोल व 4 सेंमी लांब जखम असल्याचे समोर आले होते. त्यांच्या शरीरात अल्कोहल आणि पेनकिलरसारख्या औषधाचे अंश सापडले.
- डोक्यात अनेक ठिकाणी क्लॉटिंग होती. कॉलर बोन आणि लेफ्ट अपर आर्मवर हेअरलाइन फ्रॅक्चर होते. 
 
पोलिस काय म्हणाले?
- ओशिवारा ठाण्याचे सीनियर इन्स्पेक्टर सुभाष खानविलकर यांनी DainikBhaskar.com ला सांगितले, की "आम्ही प्रत्येक बाजुने चौकशी करत आहोत. पुरी ज्या बिल्डिंगमध्ये वास्तव्याला होते, तेथील विजिटर्स रजिस्टर आणि सीसीटीवी ताब्यात घेण्यात आले आहे. शेवटच्या 24 तासांत पुरी ज्या लोकांना भेटले होते, त्या सगळ्यांची चौकशी केली जातेय.  
- शनिवारी पोलिसांनी ओम पुरींचे ड्रायव्हर राम प्रमोद मिश्रा आणि निर्माते खालिद किदवई यांची तीन तास चौकशी केली. रविवारी पुन्हा एकदा खालिद यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पोलिसांनी पुरी यांची दुसरी पत्नी नंदिता पुरी यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्या आल्या नाहीत. मंगळवारी त्या चौकशीसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

मृत्यूच्या आठवड्याभरापूर्वी ड्रायव्हरसोबत दिसले होते ओम पुरी, पुढील स्लाईडवर बघा व्हि़डिओ...
बातम्या आणखी आहेत...