आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरींच्या पहिली पत्नी सीमा कपूर यांनीही ठेवली प्रार्थना सभा, पोहोचले मोजकेच कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ओम पुरींच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही पत्नी चर्चेत आल्या आहेत. ओम पुरी यांचे पहिले लग्न अभिनेते अनू कपूर यांची बहीण सीमा कपूर यांच्यासोबत झाले होते. लग्नाच्या वर्षभरातच ओम पुरी आणि सीमा कपूर विभक्त झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार असलेल्या नंदितासोबत दुसरे लग्न केले, पण हे लग्नही लवकरच संपुष्टात आले. दुस-या लग्नापासून ओम पुरी यांना एक मुलगा असून त्याचे नाव ईशान आहे. 

ओम पुरींच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी त्यांच्या दोन्ही पत्नींनी एकाच दिवशी पण वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. सीमा कपूर यांनी अंधेरीस्थित एका गुरुद्वारामध्ये तर नंदिता पुरी यांनी जुहूस्थित ईस्कॉन टेम्पलमध्ये प्रार्थना सभा ठेवली होती. नंदिता पुरी यांनी ठेवलेल्या प्रार्थना सभेला अमिताभ बच्चन, ऐश्वर्या-अभिषेक यांच्यापासून ते नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक, प्रेम चोप्रा, प्रकाश झा, प्रिया दत्त, सिद्धार्थ रॉय कपूर,  रणधीर कपूर, श्रेयस तळपदे, कैलाश खेर, जावेद जाफरी यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

तर सीमा कपूर यांनी ठेवलेल्या प्रार्थना सभेला अगदी मोजकेच कलाकार पोहोचले होते. अभिनेत्री शबाना आझमी आणि मीता वशिष्ठ यांनी दोन्ही ठिकाणी हजेरी लावली होती. तर दिव्या दत्ता, कुलभूषण खरंबदा, जॅकी श्रॉफ, सुनील पाल असे मोजकेच कलाकार गुरुद्वा-यात पोहोचले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, गुरुद्वा-यात पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...