आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त राहिले ओम पुरींचे वैवाहिक आयुष्य, दुसऱ्या पत्नीने केले होते अनेक खळबळजनक खुलासे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांचे वयाची 66 वर्षी निधन झाले. 6 जानेवारीच्या सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवुडचे हरहुन्नरी अभिनेते आणि पद्मभूषणने सम्मानित ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1951 रोजी पटियालामध्ये झाला होता.  बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये दमदार अभिनयाची छाप उमटवणा-या ओम पुरींच्या खासगी आयुष्याला वादाची किनार आहे.
 
दोन्ही लग्न ठरले वादग्रस्त...  
ओम पुरी यांचे खासगी आयुष्य वादग्रस्त राहिले. त्यांनी दोन लग्नं केली होती. 1990 मध्ये सीमा कपूरसोबत त्यांचे लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या वर्षभरातच त्यांच्या आयुष्यात नंदिताची एन्ट्री झाली होती. सीमा यांना सोडून नंदितासोबत संसार थाटण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. सीमा यांनी नंदितावर त्यांचा संसार मोडल्याचा आरोप लावला होता. घटस्फोटानंतर ओम पुरींनी  1993 मध्ये नंदिता यांच्यासोबत दुसरे लग्न केले. ओम पुरी आणि नंदिता यांचा एक मुलगा असून ईशान हे त्याचे नाव आहे. नंदिता यांनी ओम पुरी यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. 2013 मध्ये हे दोघेही विभक्त झाले होते.  

वर्षभरही टिकले नव्हते ओम पुरींचे पहिले लग्न, वाचा, पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...