आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरी या वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आले होते, PMवर केली होती उपहासात्मक टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. या वृत्ताला ओम पुरी यांची घटस्फोटीत पत्नी नंदिता पुरी यांनी दुजोरा दिला आहे.

ओम पुरी यांच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

ओम पुरी यांनी काही महिन्यांपूर्वी भारतील सैनिकांबाबत वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात भारतीय सैनिकांचा अपमान केला होता. 'उरी हल्ल्यानंतर भारतीय चित्रपट, मालिकांत पाकिस्तानी कलावंतांवरील बंदी', असा चर्चेचा विषय होता. ओम पुरी यांनी ‘सैनिकांना लष्करात जा, असे कोणी सांगितले होते? शस्त्रे उचला, असे त्यांना कोणी सांगितले होते?’ असे प्रश्न उपस्थित केले होते. यावरून ओम पुरी यांच्याविरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक तक्रार दाखल झाली होती.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शंकर गोरा यांनी ही तक्रार दाखल केली होती. ओम पुरी यांनी मानहानीकारक वक्तव्य करून जवानांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत नमूद केले आहे. आम्ही या तक्रारीची चौकशी करत आहोत, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे चांद यांनी सांगितले. महाराष्ट्रातही ओम पुरी यांच्याविरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात ऑक्टोबरला तक्रार दाखल झाली होती. एका टीव्ही चॅनेलने पुरी यांना चर्चेसाठी बोलावले होते.

अखेर ओम पुरी यांनी इटावा येथील शहीद जवानाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले होते. शहीद जवानाच्या वडिलांची माफी मागीतली होती. 

पुढील स्लाइडवर वाचा... मोदींच्या मांडीवर बसण्याशिवाय पर्याय नाही, ओम पुरींची उपहासात्मक टीका

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...