आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Om Puri Death Update: Shabana Azmi Spotted At Cooper Hospital, Celebs Clicked At Om Puri\'s House

pics: शशी कपूर, जावेद अख्तर, विद्या बालनसह बॉलिवूड कलाकारांनी घेतले ओम पुरींचे अंत्यदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  
मुंबई: बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांनी  वयाच्या 66 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 6 जानेवारीच्या सकाळी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदनासाठी त्यांचे पार्थिव मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते. ओम पुरी यांची दुसरी पत्नी नंदितासोबत अभिनेत्री शबाना आझमी रुग्णालयात हजर होत्या. यावेळी शबाना आझमी शोकाकूल दिसल्या. त्यांनी मीडियाशी बोलणेही टाळले. 

ओमपुरींच्या पत्नीच्या घरी पोहोचले हे कलाकार...
शवविच्छेदनानंतर ओम पुरी यांचे पार्थिव त्यांच्या दुस-या पत्नी नंदिता यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. नंदिता या अंधेरी परिसरातील त्रिशुल बिल्डिंगमध्ये वास्तव्याला आहेत. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर, विद्या बालन, जावेद अख्तर, शबाना आझमी, आलोक नाथ, श्याम बेनेगल, डायरेक्टर कबीर खान, फिल्ममेकर प्रकाश झा, अभिनेता दीपक डोबरियाल, दलीप ताहिल, रत्ना पाठक, मनोज पाहवासह अनेक कलाकारांनी ओम पुरी यांचे अंत्यदर्शन घेतले. 2013 मध्ये नंदितापासून विभक्त झाल्यानंतर ओम पुरी ओकलैंड पार्क, लोखंडवाला येथे एकटे राहात होते.   

पुढील स्लाईड्समध्ये बघा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...