आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरींनी असे घालवले शेवटचे क्षण, मुलाला भेटण्याची इच्छा राहिली अपूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते ओम पुरी आता आपल्यात नाहीत. शुक्रवारी (6 जानेवारी) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजल्यापासून ते रात्रीचे बारा वाजेपर्यंत चित्रपट दिग्दर्शक खालिद किदवई यांच्यासोबत होते. किदवई यांच्या आगामी 'रामभजन जिंदाबाद' या सिनेमात ओम पुरी काम करत होते. गुरुवारी संध्याकाळ ओम पुरींनी कशी घालवली, याची माहिती दिग्दर्शक खालिद किदवई यांनी एका मुलाखतीत दिली. 
 
 
किदवई यांनी सांगितले, "मी काल संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ओम पुरी यांच्या घरी गेलो होतो. तेथे त्यांची एक मुलाखत सुरु होती. मुलाखत संपल्यानंतर मला एका कार्यक्रमाला जायचे आहे, तू माझ्यासोबत चलशील का, असे मला विचारले. मी त्यांना म्हटले, मला निमंत्रण नाही, मी कसे येऊ... मग ओम पुरी म्हणाले, ठिका आहे, तू मला तिथवपर सोड. नंतर आम्ही अभिनेते मनोज पाहवांच्या घरी पोहोचलो. तेथे ओम पुरींचा एका व्यक्तीसोबत बराच वाद झाला. काही वेळाने ओम पुरी मला म्हणाले, चल येथून निघुयात. मग आम्ही साडे दहाच्या सुमारास तेथून निघून गेलो." 

  
मुलाला भेटण्याची इच्छा राहिली अपूर्ण 
थोड्या वेळाने ओम पुरींनी त्यांचा मुलगा ईशानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दुसरी पत्नी नंदिता पुरी यांच्या सोसायटी बाहेर पोहोचल्यानंतर त्यांनी ईशांतला फोन केला. ईशांत तेव्हा एका पार्टीत होता. ईशांतने त्यांना पार्टीत येण्यास सांगितले. तेव्हा ओम पुरी त्याला म्हणाले, की मी पार्टीत येणार नाही. गाडीतच ओम पुरींनी एक ड्रिंक घेतले आणि जर ड्रिंक संपेपर्यंत मुलगा आला नाही, तर येथून निघून जाऊ, असे त्यांनी मला सांगितले. काही वेळाने आम्ही तेथून निघून गेलो. 
मुलाविषयी ओम पुरी अतिशय भावूक होते. ते म्हणत होते, मी सर्वकाही देतो, पैसा, फ्लॅट, नोकर... पण तरीही मुलाला भेटू देत नाही. 

पुढे वाचा, ओम पुरी म्हणाले, मला तुझा गर्व वाटतो... 
बातम्या आणखी आहेत...