आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅलीवूडमध्येही चमकले अाेम पुरी, फारशी इंग्रजी येत नसतानाही चक्क २१ हाॅलीवूड चित्रपटांत काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘घा शीराम काेतवाल’ या मराठी चित्रपटात भूमिका केल्यानंतर अाेम पुरी यांनी १९७६ मध्ये बाॅलीवूडमध्ये पदार्पण केले. १९८० मध्ये त्यांचा पहिलाच चित्रपट ‘अाक्राेश’ हिट ठरला. सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी पटकावला. १९८३ मध्ये ‘अर्धसत्य’ चित्रपटातील त्यांची बंडखाेर पाेलिस अधिकाऱ्याची भूमिका खूपच गाजली. त्याला सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसेच १९९० मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गाैरवले. अभिनयाच्या क्षेत्रातील चार दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे २०० हिंदी चित्रपट केले. फारशी इंग्रजी येत नसतानाही त्यांनी चक्क २१ हाॅलीवूड चित्रपटांतही काम केले. मिर्च मसाला, धारावी, कथा, तमस, जाने भी दाे याराे हे त्यांचे चित्रपट अाजही लाेकप्रिय अाहेत. ‘कक्का जी कहिन’ या मालिकेतून त्यांनी छाेटा पडदाही गाजवला.
  
१८ अाॅक्टाेबर १९५० राेजी हरियाणातील अंबालात अाेम पुरी यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांच्या घरी गरिबी हाेती. त्यामुळे त्यांना ढाब्यावर नाेकरी करावी लागली. मात्र मालकाने चाेरीचा अाराेप करत कामावरून काढून टाकले. घरामागील रेल्वे यार्डात उभ्या गाड्यांमध्ये अनेक रात्री त्यांनी काढल्या. तिथेच रेल्वे ड्रायव्हर हाेण्याचे स्वप्न त्यांनी बघितले. कालांतराने ते शिक्षणासाठी अाजाेळी पतियाळात गेले. तिथे एका वकिलाकडे नाेकरी करू लागले. साेबतच नाटकांतही अभिनय करू लागले. एकदा नाटकाच्या नादात कामावर न गेल्यामुळे वकिलानेही त्यांना नाेकरीवरून काढून टाकले. त्यानंतर खालसा महाविद्यालयात लॅब असिस्टंटची नाेकरी मिळाली. कालांतराने दिल्लीतील ‘एनएसडी’ व पुण्यातील ‘एफटीअायअाय’मध्ये अभिनयाचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली.

‘एफटीअायअाय’मध्ये ‘अर्धसत्य’ने अादरांजली
पुणे- ज्या संस्थेत अभिनेता ओम पुरी यांनी चित्रपटातील अभिनय कलेचे औपचारिक प्रशिक्षण पूर्ण केले, त्या इंडियन फिल्म अँड टेलिव्हिनज इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेने आपल्या माजी विद्यार्थ्यांला आगळे अभिवादन केले. संस्थेत ओम पुरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. त्यानंतर पुरी यांच्या सर्वाधिक गाजलेल्या ‘अर्धसत्य’चा शो दाखवण्यात आला.  
  
ओम पुरी यांनी एफटीआयआयमध्ये अभिनयाच्या अभ्यासक्रमासाठी १९७४ ते १९७६ या काळात प्रवेश घेतला होता, अशी माहिती फिल्म्स विभागाचे अधिष्ठाता अमित त्यागी यांनी दिली. आम्ही दोघांनी ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. अर्धसत्य, आक्रोश, द्रोहकाल यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांत पुरी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला, असे ते म्हणाले. २००९ मध्ये पुरी यांनी संस्थेतील अभिनयाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतली होती, याचीही आठवण त्यांनी सांगितली. पुरी यांचे तत्कालीन जुने फोटोही त्यागी यांनी विद्यार्थ्यांना दाखवले आणि पुरी यांच्या आठवणी जागवल्या. 
 
पुढिल स्लाइडवर पहा ओम पुरींनी हॉलिवूडमध्ये केलेल्या भूमिकांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...