आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरी अनंतात विलीन, अमिताभ, अनुपम खेर यांच्यासह अनेक कलाकारांनी दिला अखेरचा निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओम पुरींच्या अंत्य यात्रेत सहभागी झालेले अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अभिषेक बच्चन आणि अनिल कपूर,  ओम पुरी यांची पत्नी नंदिता आणि मुलगा ईशान - Divya Marathi
ओम पुरींच्या अंत्य यात्रेत सहभागी झालेले अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अभिषेक बच्चन आणि अनिल कपूर, ओम पुरी यांची पत्नी नंदिता आणि मुलगा ईशान
 
मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी (वय 66) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांचे पार्थिव विवस्त्र स्वरूपात फ्लॅटमधील स्वयंपाकघरात आढळले होते. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने ओम पुरींची प्राणज्योत मालवल्याची चर्चा होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे समोर आल्याने त्यांच्या मृत्यूकडे पोलिसही संशयाने पाहू लागले आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अनेक तारे- तारकांच्या उपस्थितीत ओम पुरी यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

ओम पुरी यांच्या दुस-या पत्नी नंदिता पुरी यांच्या अंधेरी स्थित घरी ओम पुरींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ओशिवारा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओम पुरी यांचा मुलगा ईशान याने ओम पुरी यांचा अंत्यविधी पूर्ण केला. 

अमिताभ बच्चन, शशी कपूरसह अनेक कलाकारांनी दिला ओम पुरींना अखेरचा निरोप 
अमिताभ बच्चन, शशी कपूर, अनुपम खेर, जावेद अख्तर, शबाना आझमी, विद्या बालन, अनिल कपूर, शक्ति कपूर, इरफान खान, मनोज बाजपेयी, परेश रावल, फिल्ममेकर प्रकाश झा, आलोक नाथ, सुप्रिया पाठक, रत्ना पाठक, पंकज कपूर, जॉनी लीवर, श्याम बेनेगल, डायरेक्टर कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर, अभिनेता दीपक डोबरियाल, दलीप ताहिल, रत्ना पाठक, मनोज पाहवासह अनेक कलाकारांनी ओम पुरी यांना अखेरचा निरोप दिला.
 
अंत्ययात्रेत पोहोचली होती पहिली पत्नी 
ओम पुरींचे अंत्य दर्शन घ्यायला त्यांच्या पहिल्या पत्नी सीमा कपूर आल्या होत्या. यावेळी सीमा यांना अश्रू अनावर झाले होते. ओम पुरी 1991 मध्ये पहिली पत्नी सीमा कपूरपासून विभक्त झाले होते. तर 2013 मध्ये दुसरी पत्नी नंदितासोबतही त्यांचा घटस्फोट झाला होता. दुस-या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर ओम पुरी ओकलँड पार्क, लोखंडवाला येथे एकटे राहात होते.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, ओम पुरी यांच्या अंत्ययात्रेची छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...