आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरींच्या दुस-या पत्नीने ठेवली प्रार्थना सभा, बिग बींच्या कुटुंबासह पोहोचले हे कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः जुहूस्थित इस्कॉन टेम्पलमध्ये दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. ओम पुरींची दुसरी पत्नी नंदिता पुरी यांनी या प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. ओम पुरी यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचे मित्र आणि अभिनेते टॉम अल्टर सर्वप्रथम पोहोचले होते. 66 वर्षीय ओम पुरी यांचे 6 जानेवारी रोजी निधन झाले होते. 

बच्चन कुटुंबीयांसह पोहोचले अनेक कलाकार...  
ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन यांच्याव्यतिरिक्त शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि त्यांच्या पत्नी रत्ना पाठक, प्रेम चोप्रा, प्रकाश झा, प्रिया दत्त, सिद्धार्थ रॉय कपूर,  रणधीर कपूर, श्रेयस तळपदे, कैलाश खेर, जावेद जाफरी यांच्यासह अनेक कलाकारांनी या प्रार्थना सभेला उपस्थिती लावून ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली. 
 
पहिल्या पत्नीनेही ठेवली होती प्रार्थना सभा... 
ओम पुरी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पहिल्या पत्नी सीमा कपूर यांनीही प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. सीमा यांनी अंधेरीस्थित चार बंगला परिसरातील गुरुद्वारामध्ये प्रेयर मीट ठेवली होती. अभिनेत्री शबाना आझमी यांनी याही प्रार्थना सभेला हजेरी लावली होती.  

 
किचनमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळले होते ओम पुरी यांचे पार्थिव... 
100 हून अधिक हिंदी आणि 20 हून अधिक हॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेले ओम पुरी यांचे पार्थिव त्यांच्या घरातील किचनमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळून आले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, पुरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आढळून आली आहे. शिवाय त्यांच्या शरीरात अल्कोहोल आणि पेनकिलर औषधांचे कण आढळले होते.   

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ओम पुरी यांच्या दुस-या पत्नी नंदिता पुरींनी ठेवलेल्या प्रेयर मीटचे PHOTOS...