आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On-Location : या अंदाजात जॉन-श्रुतीने शूट केला 'Welcome Back' मधील पार्टी नंबर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता जॉन अब्राहम आणि श्रुती हासन)
मुंबईः आगामी 'वेलकम बॅक' या सिनेमातील लीड स्टार्स जॉन अब्राहम आणि श्रुती हासन अलीकडेच या सिनेमातील स्पेशल पार्टी साँगचे शूटिंग करताना दिसले. सेटवर दोन्ही स्टार्सनी डान्स नंबरवर ताल धरला होता. मीडियाशी बोलताना जॉन म्हणाला, हे गाणे नक्कीच लोकांना एन्टरटेनिंग करणारे ठरेल, असा मला विश्वास आहे.
यावेळी जॉन ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. तर श्रुतीने कॉपर कलरचा शॉर्ट ड्रेस आणि मॅचिंग शूज घातले होते. गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. तर मीका सिंगने हे गाणे स्वरबद्ध केले आहे. जॉन आणि श्रुतीच्या या गाण्यात मीका सिंगसुद्धा झळकणार आहे.
'वेलकम बॅक' हा 2007 मध्ये आलेल्या 'वेलकम' या सिनेमाचा सिक्वेल आहे. सिनेमात जॉन अब्राहम आणि श्रुती हासन यांच्याशिवाय अनिल कपूर, नाना पाटेकर, नसीरुद्दीन शाह, परेश रावल आणि डिंपल कपाडिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
कॉमेडीचा तडका असलेला हा सिनेमा अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला असून यावर्षी 4 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'वेलकम बॅक' या सिनेमाचे On-Location Photos...