आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Location Photos Of Akshay Nimrat Starrer \'Airlift\'

On-Location: रास अल-खैमा आणि राजस्थानमध्ये झाले \'एअरलिफ्ट\'चे शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वर) डायरेक्टर राजा कृष्ण मेनन (खाली) डावीकडे आदिबा हुसैन आणि उजवीकडे निमरत कौरसोबत अक्षय कुमार - Divya Marathi
(वर) डायरेक्टर राजा कृष्ण मेनन (खाली) डावीकडे आदिबा हुसैन आणि उजवीकडे निमरत कौरसोबत अक्षय कुमार

मुंबईः शुक्रवारी अक्षय कुमार स्टारर 'एअरलिफ्ट' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित हा सिनेमा कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेस्क्यू ऑपरेशवर हा आधारित आहे. 1990 मधील सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाची सध्या सगळीकडे मोठ्या प्रमणावर चर्चा सुरू आहे. युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांना अगदी सुखरुप घरी परत आणण्यात यावेळी यश आले होते. सिनेमात अक्षयने कुवैतमध्ये वास्तव्याला असलेल्या रंजीत कट्याल या बिझनेसमनची भूमिका वठवली आहे. तर निमरत कौरने त्याची पत्नी अमृता कट्याल आणि बालकलाकार आदिबा हुसैन त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आहे.
येथे झाले 'एअरलिफ्ट'चे शूटिंग
'एअरलिफ्ट'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल अल-खैमा (UAE) मध्ये पूर्ण झाले. येथे कुवैतच्या पार्श्वभूमीवर सेट्सची निर्मिती करण्यात आली होती. दुसरे शेड्युल राजस्थान (जैसलमेर) येथे तर उर्वरित शूटिंग दिल्ली आणि मुंबईत पूर्ण करण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'एअरलिफ्ट'चे ON-LOCATION PHOTOS...