आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा होता 'HAHK', सेटवर असा असायचा स्टार्सचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हम आपके है कौन'च्या सेटवर दिग्दर्शक सूरज बडजात्या, सलमान खान आणि मोहनिश बहल - Divya Marathi
'हम आपके है कौन'च्या सेटवर दिग्दर्शक सूरज बडजात्या, सलमान खान आणि मोहनिश बहल

एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या 'हम आपके है कौन' या म्युझिकल रोमँटिक कॉमेडी सिनेमाच्या रिलीजचा 5 ऑगस्ट रोजी 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. राजश्री प्रॉडक्शनच्या फेसबुक पेजवर सिनेमाच्या ऑनलोकेशनची निवडक छायाचित्रे बघायला मिळतात.

5 ऑगस्ट 1994 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमात आजचा सुपरस्टार सलमान खान, धक-धक गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली माधुरी दीक्षित, मोहनीश बहल, रेणुका शहाणे आणि आलोकनाथ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमातील गाणी आजही लग्नसमारंभात ऐकायला मिळतात.

राजश्री प्रॉडक्शनच्या 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'नदिया के पार' या सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमाने त्याकाळी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल 135 कोटींची कमाई केली होती. शंभर कोटींहून अधिकचा व्यवसाय करणारा हा पहिला हिंदी सिनेमा होता.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाच्या ऑनलोकेशनची छायाचित्रे...

सर्व फोटोजः साभार राजश्री प्रॉडक्शन
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...